लोकमत न्यूज नेटवर्कवर्शी : खान्देशात श्रावण महिन्यातील रविवारी ठिकठिकाणी कानुमातेची स्थापना करण्यात येते. हा उत्सव जवळच येऊन ठेपल्याने येथील कारागिरांनीही कामाला वेग दिला आहे. येथे कुठल्याही अत्याधुनिक मशिनरीचा वापर न करता लाकडावर कोरीव काम करुन कानुमातेची मूर्ती साकारली जाते.गावातील सुतार काम करणारे प्रकाश दगा सुर्यवंशी हे लाकडावर कोरीव काम करुन कानुमातेची साकारतात. त्यांना मूर्ती बनविण्यासाठी किमान ८ ते १० दिवस लागतात. मूर्ती घडविण्यासाठी सुमारे ५ ते ६ हजारापर्यंत खर्च येतो. सर्व सजावटीसह १२ ते १३ हजारापर्यंत खर्च होतो. मूर्तीवर चढविलेला श्रृंगार लक्ष वेधून घेतो. मूर्ती बनवायची असल्याने भाविकांना किमान एक ते दीड महिना अगोदर सांगावे लागते. त्यांनी घडविलेल्या मूर्ती साक्री, शिरपूर, शिंदखेडा, यावल, पारोळा तालुक्यात गेल्या आहेत.
कोरीव कामातून साकारते कानुमाता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 22:19 IST