कंचनपूरला वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 22:22 IST2021-04-03T22:21:55+5:302021-04-03T22:22:17+5:30
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील कंचनपूर येथे अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडले आहे. जिल्हास्तरीय गाैण खनिज ...

कंचनपूरला वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडले
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील कंचनपूर येथे अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडले आहे.
जिल्हास्तरीय गाैण खनिज भरारी पथकाचे प्रमुख तथा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाइ करण्यात आली. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून वाळूचे लिलाव झाले नाहीत. एक प्रकारे वाळू बंदीच आहे. असे असले तरी नदी-नाल्यांमधून वाळू उपसा सुरुच आहे.
वाळू चोरीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाने विशेष पथक तयार केले आहे. कंचनपूर येथे वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी सकाळी ३ वाजता कंचनपूर शिवारात वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर या पथकाने पकडले. दोन्ही ट्रॅक्टर तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले असून त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
महसूल विभागाच्या या विशेष पथकाने याआधी देखील अनेक वाहने पकडून कारवाई केली आहे. खनिकर्म अधिकारी, वाहन चालक आणि दोन पोलीस कर्मचारी असे पथक आहे. वाहनाच्या मंजूर क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास आरटीओ अधिकारी देखील पथकात असतात.