शिवसेनेच्या महिला संघटकपदी ज्योती पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:32 IST2021-03-15T04:32:19+5:302021-03-15T04:32:19+5:30
धुळे : शिवसेनेच्या धुळे जिल्हा ग्रामीण महिला आघाडीच्या जिल्हा संघटकपदी ज्योती दिनेश पाटील, शिरपूर विधानसभा उपजिल्हा संघटकपदी वीणा वैद्य, ...

शिवसेनेच्या महिला संघटकपदी ज्योती पाटील
धुळे : शिवसेनेच्या धुळे जिल्हा ग्रामीण महिला आघाडीच्या जिल्हा संघटकपदी ज्योती दिनेश पाटील, शिरपूर विधानसभा उपजिल्हा संघटकपदी वीणा वैद्य, शिरपूर तालुका उपसंघटकपदी अर्चना देसले, शिरपूर विधानसभा संघटक लक्ष्मी कोकणी आदींची निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त महिला पदाधिकारींचा नुकताच सत्कार करण्यात आला.
धुळे जिल्हा ग्रामीणच्या वतीने नरडाणा, ता. शिंदखेडा येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे व नंदुरबार जिल्हा शिवसेनेचे उपसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे होते. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, शिंदखेडा तालुका अध्यक्ष गिरीश देसले, शिरपूर तालुका अध्यक्ष अत्तरसिंग पावरा, दीपक चोरमले, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, शिंदखेडा विधानसभा क्षेत्र संघटक छोटू पाटील, शिंदखेडा तालुका समन्वयक विनायक पवार, युवासेनेचे प्रदीप पवार, गणेश परदेशी उपस्थित होते.
यावेळी धुळे ग्रामीणच्या जिल्हा संघटक ज्योती दिनेश पाटील, उपसंघटक वीणा वैद्य, तालुका संघटक अर्चना देसले, धुळे शहर संघटक डॉ. जयश्री वानखेडे यांचा निवडीबद्दल, तर ग्रामपंचायत निवडीबद्दल साई चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष शरद पाटील व स्मिता पाटील यांचादेखील संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना ज्योती पाटील म्हणाल्या की, पक्षाने केलेली निवड सार्थ ठरवण्यासाठी मी निश्चित प्रयत्नशील राहील. ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपल्या सरकारने ८ मार्च २०२१ पासून महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ केला आहे. आपला पक्ष महिलांना खऱ्या अर्थाने न्याय देत आहे.
यावेळी प्रा. खासेराव पाटील, डॉ. जयश्री वानखेडे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश पाटील, सूत्रसंचालन शिवानी पवार यांनी केले, तर आभार रिना पाटील यांनी मानले.