बस थांबविली नाही वाहकाला मारहाण

By Admin | Updated: February 22, 2017 00:25 IST2017-02-22T00:25:28+5:302017-02-22T00:25:28+5:30

दोंडाईचा : बस थांबविली नाही याचा राग आल्याने वाहकाला एका प्रवाशाने मारहाण केल्याची घटना दोंडाईचा बसस्थानकात सोमवारी सायंकाळी घडली़.

Just stop the carrier not stopped | बस थांबविली नाही वाहकाला मारहाण

बस थांबविली नाही वाहकाला मारहाण

दोंडाईचा : बस थांबविली नाही याचा राग आल्याने वाहकाला एका प्रवाशाने मारहाण केल्याची घटना दोंडाईचा बसस्थानकातील कॅबिनमध्ये सोमवारी सायंकाळी घडली़ याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आह़े 
दोंडाईच्याहून शिंदखेडा  प्रवासादरम्यान सोमवारी एमएच 20- बीएल 9491 क्रमांकाची बस  दीपक सुभाष पाटील याने  हात दाखवूनही  चिलाणे येथे थांबली नाही.
याचा राग आल्याने सोमवारी सायंकाळी परतीच्या प्रवासात सव्वासहा वाजेच्या सुमारास ही बस  येथे आली. तेव्हा चिलाणे येथून येऊन बसची वाट पाहत बसलेल्या दीपक पाटील याने बसचे वाहक सतीश विजय देशमुख  यांना दोंडाईचा बसस्थानकाच्या कॅबिनमध्ये घुसून मारहाण करुन शिवीगाळ केली. यावेळी त्याठिकाणी प्रवाशांची गर्दी जमा झाली होती.
याप्रकरणी वाहक  देशमुख यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून  दीपक पाटील याच्याविरुध्द भादंवि कलम 353, 332, 427, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात    आला आह़े पुढील तपास हे.कॉ. डी़ आऱ कदम करीत      आहेत़

Web Title: Just stop the carrier not stopped