धुळे- कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्ये सोबतच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. आॅगस्ट महिना सुरु झाल्यानंतर सहा १ ते ६ आॅगस्ट या सहा दिवसांच्या दरम्यान तब्बल २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.४बऱ्याचदा एका दिवसात शंभर पेक्षा जास्त रुग्णांची भर पडते आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत १३४ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.४आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोनाने कहर केला आहे. १ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील सहा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.४दोन आॅगस्ट रोजी दोन, तीन रोजी सहा, चार रोजी तीन, पाच रोजी एक तर सहा आॅगस्ट रोजी आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना कोरोनमुक्त होणाºया रुग्णांमुळे काही अंशी दिलासा मिळाला आहे. एक ते सहा आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील ४६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १ आॅगस्ट रोजी ९७ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. दोन रोजी ११० रुग्णांनी कोरोनावर मात केली. तीन रोजी ४८, चार रोजी ९० व पाच आॅगस्ट रोजी १२० रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत.
सहा दिवसातच २6 बाधीत रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 12:40 IST