अवघ्या काही तासात मोबाईलवरुन पाळधीचा खुनी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 11:41 IST2019-02-19T11:41:27+5:302019-02-19T11:41:53+5:30

धुळ्यातील महिला खून प्रकरण : शहर पोलिसांची कामगिरी

In just a few hours, the murderer murderer of mobile phones is running around the mobile | अवघ्या काही तासात मोबाईलवरुन पाळधीचा खुनी गजाआड

अवघ्या काही तासात मोबाईलवरुन पाळधीचा खुनी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील खंडेराव बाजार चौकातील राजस्थान लॉजमध्ये सोमवारी रात्री महिलेचा झालेल्या खून प्रकरणी मंगळवारी पहाटे साडेबारा वाजता गुन्हा नोंदविण्यात आला़ तपासाची चक्रे फिरवित खून झालेल्या महिलेच्या मोबाईलवरुन नितीन विश्वनाथ पाटील (३४, पाळधी खुर्द, भज्जी गल्ली, स्टेशन रोड, ता़ धरणगाव जि़ जळगाव) याला खून प्रकरणातील संशयावरुन शहर पोलिसांच्या पथकाने रात्रीतून उचलले़ त्याची चौकशी केली असता त्याने महिलेचा प्रेमसंबंधातून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले़ योगिता मोहन शिरसाठ (रा़ पिंपराळा, जळगाव) येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस निरीक्षक गणेश चौधरी आणि त्यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक डी़ ए़ पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक हिरालाल बैरागी, पोलीस कर्मचारी मुक्तार मन्सुरी, कबीर शेख, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, राहुल पाटील, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी, गफ्फार शेख यांनी ही कारवाई केली़ 

Web Title: In just a few hours, the murderer murderer of mobile phones is running around the mobile