गोटे घाबरले, अन् दोनचं कार्यकर्त्यासह आले-भाजपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 15:10 IST2020-12-18T15:09:36+5:302020-12-18T15:10:56+5:30
एक हजार कार्यकर्त आनले असते तर आम्ही रस्त्यावर उतरलो

dhule
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथील फार्म हाऊस बेकायदेशीर प्रवेश प्रकरणी माजी आमदार अनिल गोटे हे एक हजार कार्यकर्यासह न आल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनवर जाता रावलगडीतील आमदार कार्यालयाजवळ अनिल गोटे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. यावेळी भाजपाच्या मान्यवर पदाधिकार्यांनी आपले विचार व्यक्त केले की,गाेटे यांनी एक हजार कार्यकर्ते आणण्याची घोषणा केली होती. मात्र ते दोन ते तीन कार्यकर्यासह पोलीस ठाण्यात हजर झाले. ते जर एक हजार कार्यकर्ते घेऊन आले असते तर आम्ही रस्त्यावर आलो असतो. पंरतू गोटे घाबरून गेले व फक्त दोनच कार्यकर्ते घेऊन आले. त्यामुळे आम्ही दोन हजार कार्यकर्ते घेऊन पोलीस ठाण्यात गेलो नाही. गोटे यांनी आमच्याशी वाद घालू नये अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही मान्यवरांनी दिला आहे. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपास्थित होते.