जयहिंदने रक्तदान चळवळीत योगदान दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST2021-06-21T04:23:41+5:302021-06-21T04:23:41+5:30
जागतिक रक्तदाता दिवसानिमित्त जयहिंद शैक्षणिक संस्था संचालित झेड. बी. पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, विवेक वाहिनी, छात्रभारती व रासेयो ...

जयहिंदने रक्तदान चळवळीत योगदान दिले
जागतिक रक्तदाता दिवसानिमित्त जयहिंद शैक्षणिक संस्था संचालित झेड. बी. पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, विवेक वाहिनी, छात्रभारती व रासेयो माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले. शिबिराचे उदघाटन जयहिंद शैक्षणिक संस्थेचे व्हा. चेअरमन प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी प्रा. सुधीर पाटील बोलत होते. याप्रसंगी सचिव प्रदीप भदाणे, संचालिका डॉ. नीलिमा पाटील, माजी उपप्राचार्य डॉ. ए. ए. पाटील, उपप्राचार्य प्रा. व्ही. एस. पवार, डॉ. डी. के. पाटील, डॉ. वर्षा पाटील, शिबिरात एकूण ३० जणांनी रक्तदान केले.
शिबिरात प्रा. डॉ. प्रशांत कसबे, प्रा. डॉ. व्ही. एन. राठोड, प्रा. डॉ. मोरेश्वर नेरकर, प्रा. डॉ. अविनाश पाटील, प्रा. डॉ. सतीश शिंदे, प्रा. प्रतीक शिंदे, प्रा. सूर्यकांत गायकवाड व मनीष मोरे यांनी स्वतः रक्तदान करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. शिबिरात डॉ. कीर्ती पटवर्धन, पी. टी. वाडिले, सागर पाटील, सी. बी. साठे, दीपक कासार व अजय डंगोरे यांनी रक्त संकलनाचे कार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विविक वाहिनी संयोजक प्रा. डॉ. पी. एस. गिरासे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत कसबे यांनी केले.