जवाहर मेडिकल फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य शिबिरात ६१४ रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:36 IST2021-02-10T04:36:42+5:302021-02-10T04:36:42+5:30

एसआरपीएफ कॅम्पमध्ये आयोजित अस्थिरोग व मेडिसिन शिबिरात ७४ एसआरपीएफ जवानांची तपासणी झाली. या कॅम्पसाठी एसआरपीएफचे समादेशक प्रल्हाद खाडे, सहायक ...

Jawahar Medical Foundation examines 614 patients in free health camp | जवाहर मेडिकल फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य शिबिरात ६१४ रुग्णांची तपासणी

जवाहर मेडिकल फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य शिबिरात ६१४ रुग्णांची तपासणी

एसआरपीएफ कॅम्पमध्ये आयोजित अस्थिरोग व मेडिसिन शिबिरात ७४ एसआरपीएफ जवानांची तपासणी झाली. या कॅम्पसाठी एसआरपीएफचे समादेशक प्रल्हाद खाडे, सहायक समादेशक सदाशिव पाटील, वैद्यकीय अधिकारी धर्मेंद्र चव्हाण यांनी सहकार्य केले. विटाभट्टी येथे आयोजित आरोग्य शिबिरात तब्बल १७० जणांची आरोग्य तपासणी झाली. या शिबिरासाठी पैलवान सागर कांबळे, पैलवान उमेश कांबळे आणि मित्रमंडळ यांचे सहकार्य लाभले.

चाळीसगाव रोडवरील हजार खोली परिसरात माजी नगराध्यक्ष नवाब बिग मिर्झा व माजी विरोधी पक्षनेते अकबर बेग मिर्झा तथा सामाजिक कार्यकर्ते शोएब बेग मिर्झा यांच्या वतीने जवाहर व मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या सहकार्यातून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४०० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबिरात नेत्ररोग, बालरोग, स्त्रीरोग, सर्जरी, मेडिसिन कान-नाक-घसा, दात आदी सर्वच रोगांची तपासणी करण्यात आली.या शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या सहकार्याने मोफत औषधेही देण्यात आली. या तिन्ही शिबिरासाठी धुळे ग्रामीणचे आमदार तथा जवाहर मेडिकल फाउंडेशनचे उपाध्यक्ष आमदार कुणाल पाटील, डॉ. ममता पाटील, सहसचिव संगीता पाटील, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील, डेंटल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अरुण दोडामनी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या शिबिराला आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले आदींनी भेटी दिल्या. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शोएब बेग मिर्झा व त्यांचे सहकारी तसेच जवाहर मेडिकल फाउंडेशनचे सर्व डॉक्टर्स, जनसंपर्क अधिकारी प्रवीण खरे, जागृती बोरसे आदींनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले. शिबिरातील दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना पुढील तपासणीसाठी जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेजमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला.

Web Title: Jawahar Medical Foundation examines 614 patients in free health camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.