जाधव व थोरातांना मिळणार सभापती पदाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:42 IST2021-02-17T04:42:53+5:302021-02-17T04:42:53+5:30
अनेक दिवसापासून महापालिकेचा सभापती पदासाठी कोणाची वर्णी लागेल अशी चर्चा होती. यात नगरसेवक शीतल नवले व व संजय जाधव ...

जाधव व थोरातांना मिळणार सभापती पदाची संधी
अनेक दिवसापासून महापालिकेचा सभापती पदासाठी कोणाची वर्णी लागेल अशी चर्चा होती. यात नगरसेवक शीतल नवले व व संजय जाधव यांच्यासह विद्यमान सभापती सुनील बैसाणे यांनीदेखील पक्षाकडे मुदत वाढीची मागणी केली होती. मात्र मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने शेवटच्या दिवशी नगरसेवक संजय सुधाकर जाधव व महिला बालकल्याण समितीच्या सभापती वंदना विक्रम थोरात, उपसभापती सभापती शकुंतला शंकर जाधव यांचा अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
अर्ज दाखल करतेवेळी महापाैर चंद्रकांत साेनार, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, नगरसेवक नागसेन बाेरसे, हर्षकुमार रेलन, बन्सीलाल जाधव, भिकन वराडे, ओमप्रकाश खंडेलवाल, वंदना भामरे, लक्ष्मी बागुल, कशिश उदासी, निंबाबाई भील आदी उपस्थित होते.