व्याधीमुळे खोटेवर पडून असलेल्या ज्येष्ठांना लसीकरणाचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:34 IST2021-03-25T04:34:41+5:302021-03-25T04:34:41+5:30
कोरोना प्रतिबंधासाठी ६० वर्षे, तसेच ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त व्यक्तींना लस घेताना अडचणी येऊ नये, याकरिता जिल्हा रूग्णालय, मनपा आरोग्य ...

व्याधीमुळे खोटेवर पडून असलेल्या ज्येष्ठांना लसीकरणाचा प्रश्न गंभीर
कोरोना प्रतिबंधासाठी ६० वर्षे, तसेच ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त व्यक्तींना लस घेताना अडचणी येऊ नये, याकरिता जिल्हा रूग्णालय, मनपा आरोग्य केंद्र, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू केले आहे. तर महानगरातील १३ खाजगी रूग्णालयात लस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी प्रत्येक केंद्राला उद्दिष्ट देण्यात आले. तिसऱ्या टप्यात लसीकरणात ज्येष्ठ नागरिकांसह हेल्थ केअर वर्कर व फ्रन्ट लाईन वर्कर, ६० वर्षांवरील नागरिक व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिक कोरोना प्रतिबंधक डोस घेत आहेत. चाेवीस दिवसांपासून लसीकरणासाठी प्रतिसाद मिळत आहे.
व्याथीग्रस्तासाठी सुविधा नाही
काही दिवसांपासून लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांसह व्याधीग्रस्त नागरिकांची लस घेण्यासाठी सरकारी व खाजगी रूग्णालयात रांगा लागल्या आहेत. अल्प व्याथी असलेल्या जेष्ठ नागरिकांना चालता फिरता येवू शकते. त्यामुळे रिक्षा व कुटूंबियांच्या मदतीने लसीकरण केंद्रावर जावू लस घेत आहेत. मात्र वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेले नागरिक व्याधीग्रस्त असल्याने खाटेवर उठू शकत नाही. अशांना केंद्रात जाऊन लस घेणे शक्य होत नाही. अशा रुग्णांना डोस देण्याबाबत आरोग्य प्रशासनाकडे सद्य:स्थितीत काहीच पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे ज्या घरात व्याधीग्रस्त व्यक्ती बऱ्याच वर्षांपासून खाटेवरच पडून आहे, अशा कुटुंबीयांची लसी करणाअभावी घालमेल सुरू आहे.
२३ हजार नागरिकांना लस
१ मार्च पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे.
आतापर्यत जिल्हयातील २३ हजार नागरिकांना लस देण्यात आलेली असून लस देण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. कोरोना संसर्ग काळात ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक धोका असतो. कोरोना लस पुर्णता सुरक्षित असल्याने प्रत्येकाने लस स्वताहून करून घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहेत.