गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST2021-06-22T04:24:25+5:302021-06-22T04:24:25+5:30
डॉ.जगदिश गिंदोडिया यांनी योग व प्राणायाम यांच्या आधारे शारीरिक व मानसिक आजार दूर ठेवणे शक्य आहे. ओंकाराचा ...

गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
डॉ.जगदिश गिंदोडिया यांनी योग व प्राणायाम यांच्या आधारे शारीरिक व मानसिक आजार दूर ठेवणे शक्य आहे. ओंकाराचा जप केल्याने शरीरातील नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण पंधरा पट वाढते हे शास्त्रीय दृष्ट्या प्रमाणित झालेले आहे. लोक काय म्हणतील व मला विचारले नाही या दोन गोष्टी सोडल्या तर माणूस आनंदी राहू शकतो व हे जीवनाचे अत्यंत महत्वाचे सूत्र डॉ. गिंदोडिया यांनी दिले. त्यांनी कपालभाती कुंभक, रेचक,हमिंग मेडिटेशन हास्य योग याबाबत सविस्तर विवेचन, प्रात्यक्षिक करून दाखवले व उपस्थितांकडून करून घेतले
यावेळी मनोहर भदाणे यांनी भारतीय संस्कृतीने योग ही जगाला दिलेली ही सगळ्यात मोठी देणगी आहे व त्याचा फायदा आपण सर्वांनी करून घेतला पाहिजे असे सांगितले. उपस्थितांना ऑनलाइन प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.ललित पाटील, डॉ.के.एम.जोशी यांनी केले. आभार उपप्राचार्य जी. एम. पोद्दार यांनी मानले. याप्रसंगी गंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विविध विभागप्रमुख डॉ.एस.व्ही.देसले, प्रा.आर.ओ.शेख, प्रा.विनोद पाटील, प्रा.राहुल पाटील उपस्थित होते.