जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग कार्यान्वित करावा, आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:27 IST2021-04-29T04:27:48+5:302021-04-29T04:27:48+5:30

डॉ. पाटील यांनी मंगळवारी रात्री जिल्हा रुग्णालयास भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. ...

Intensive care unit should be activated in the district hospital. Archana Patil's suggestions | जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग कार्यान्वित करावा, आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांच्या सूचना

जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग कार्यान्वित करावा, आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांच्या सूचना

डॉ. पाटील यांनी मंगळवारी रात्री जिल्हा रुग्णालयास भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. पाटील यांनी रुग्णांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, अतिदक्षता विभागासह ऑक्सिजनयुक्त बेडची संख्या वाढवावी. त्यासाठी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तातडीने कार्यान्वित करावा. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज नाही, अशा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे. जेणेकरून गरजू रुग्णाला ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध होऊ शकेल. याबरोबरच ऑक्सिजन मॅनेजमेंट सिस्टिम कार्यान्वित करावी. त्यानुसार दर चार तासांनी ऑक्सिजनच्या नोंदी घेत रुग्णाच्या आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा करावा. त्याची जबाबदारी स्वतंत्रपणे द्यावी.

जिल्हास्तरावरील रिक्त पदे भरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. ‘कोविड १९’ रुग्णांवर औषधोपचारासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रुग्णांवर औषधोपचार करावेत. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने चाचण्यांची संख्या वाढवीत कंटेनमेंट झोनची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. याशिवाय लसीकरण मोहीम व्यापक स्तरावर राबवीत अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करावे, असेही निर्देश डॉ. पाटील यांनी दिले.

यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे, वॉर्ड इन्चार्ज डॉ. अश्विनी भामरे, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. मोहसीन मुल्ला आदी उपस्थित होते.

Web Title: Intensive care unit should be activated in the district hospital. Archana Patil's suggestions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.