शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

बौद्धिक संपदा सुरक्षित करणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 11:58 IST

बौद्धिक संपदा हक्क विषयावर कार्यशाळा : निलेश पंडीत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

धुळे : आपल्या बौद्धिक संपदा सुरक्षित करणे ही काळाची गरज झाली आहे, असे प्रतिपादन पुणे येथील निलेश पंडित यांनी येथे केले.शहरातील झेड.बी.पाटील महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता कक्ष व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बौद्धिक संपदा हक्क’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यावेळी ‘बौद्धिक संपदा हक्क परिचय आणि अंतरदृष्टी’ विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन प्रा.सुधीर पाटील होते. यावेळी संचालिका डॉ.निलिमा पाटील, प्राचार्य डॉ. पी.एच.पवार, डॉ. शशिकांत बागडे, शिरपूर, उपप्राचार्य डॉ. ए.ए.पाटील, उपप्राचार्य डॉ. चुडामण पगारे, उपप्राचार्या डॉ.विद्या पाटील उपस्थित होते.निलेश पंडित पुढे म्हणाले की भारतीय विद्यार्थी, संशोधक हे संशोधनात पुढे आहेत. त्यांचे संशोधन जगाच्या संशोधनापेक्षा वेगळे व उपयोगी आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेत ते आपल्या संशोधनाचे पेटेंट मिळवित नाही. तसे केले नाही तर भारतीयांचे ज्ञान चोरून इतर देश पुढे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. खासकरून युवा संशोधकांनी आपल्या संशोधनाचे पेटंट घेण्यासाठी जागृत रहावे.डॉ.शशिकांत बागडे यांनी ‘बौद्धिक संपदा हक्क क्षेत्रातील निरंतर शिक्षण आणि करियरची शक्यता’ या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की कुठलीही आणि कुणाचीही निर्मिती ही त्याची वैयक्तिक संपत्ती मानून त्याचा व्यावसायिक वापर करण्यापूर्वी परवानगी घेणे, नामनिर्देश अथवा किंमत मोजून वापरणे आवश्यक आहे, याची जागृती बौद्धिक संपदा हक्कांमधून केली जाते .अध्यक्ष प्रा.सुधीर पाटील म्हणाले की राष्ट्रीय स्तरावर ‘बौद्धिक संपदा हक्क’ जागृती होणे गरजेचे असल्याचे सांगून यासाठी राष्ट्रीय संशोधन केंद्र, विद्यापीठ व महाविद्यालय यासर्व स्तरावर सातत्याने प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पी. एच.पवार यांनी केले. तर समन्वयक प्रा.डॉ.पी. आर.चौधरी यांनी कार्यशाळेचा आढावा घेतला. सूत्रसंचालन प्रा.डॉ.वर्षा पाटील यांनी कु.गायत्री नवसारे हिने आभार मानलेत. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.टी.जे. पाटील, डॉ. एम. डी.महानुभाव, डॉ. पी. के.पाटील, डॉ. आर.डी. शेलार, डॉ. आर. पी. बोराळे, प्रा.गिरीश देसले, प्रा. राकेश देवरे, डॉ.दिपक नगराळे, प्रा. प्रितेश जैन,प्रा. मनोज बच्छाव यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Dhuleधुळे