डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:27 IST2021-06-04T04:27:23+5:302021-06-04T04:27:23+5:30
अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीबाबतचे निवेदन शिरधाणे, खंडलाय, बांबुर्ले, भदाणे या भागातील शेतकऱ्यांनी आमदार कुणाल पाटील यांना ...

डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या सूचना
अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीबाबतचे निवेदन शिरधाणे, खंडलाय, बांबुर्ले, भदाणे या भागातील शेतकऱ्यांनी आमदार कुणाल पाटील यांना दिले. त्यामुळे जिल्हाधिकारी संजय यादव तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आ. पाटील यांनी सांगितले की, अक्कलपाडा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या डाव्या कालव्यातील सिंचन क्षेत्र परिसरात भदाणे, खंडलाय, बांबुर्ले, शिरधाणे, नवलाने चिंचवार, मेहेरगाव, कावठी खेडे, वार, निमडाळे, गोंदूर ही गावे येतात. मात्र मे आणि जून महिन्यात या गावांच्या शेतातील विहिरींतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी व मशागतीसाठीही पाण्याची गरज भासते, मात्र या भागातील विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने कापूस लागवडीसह खरीप हंगामाची पूर्वतयारी खोळंबली त्यामुळे म्हणून अक्कलपाडा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या डाव्या कालव्यात पाणी सोडल्यास या भागातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेतीसाठी मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते, म्हणून तातडीने डावा कालवामध्ये पाणी सोडण्याच्या सूचना आ. कुणाल पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.