झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला तरी शेतकरी होऊ शकतात मालामाल! हमीभाव मिळत नसल्याने जिल्ह्यात घटला सोयाबीनचा पेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:42 IST2021-09-15T04:42:02+5:302021-09-15T04:42:02+5:30
परंतु पावसाचा लहरीपणा आणि हमीभाव मिळत नसल्याने जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा यंदा घटल्याचे चित्र आहे. दरवर्षी शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र ...

झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला तरी शेतकरी होऊ शकतात मालामाल! हमीभाव मिळत नसल्याने जिल्ह्यात घटला सोयाबीनचा पेरा
परंतु पावसाचा लहरीपणा आणि हमीभाव मिळत नसल्याने जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा यंदा घटल्याचे चित्र आहे. दरवर्षी शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू होतात; परंतु वशिलेबाजीमुळे सामान्य शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होत नाही. नाईलाजाने कमी भावात बाजारात विक्री करावी लागते. गेल्या दोन वर्षांत आलेल्या वाईट अनुभवांमुळे यंदा सोयाबीनचा पेरा घटल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, कमी दिवसांत उत्पन्न हाती येईल, अशा नवनवीन वाणांकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. भाव देखील चांगला मिळत आहे.
दरवर्षी, साेयाबीनचे तेच ते वाण घेतल्याने उत्पादनावरही परिणाम होतो. त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी लवकर येणाऱ्या वाणांची लागवड केली आहे. कमी दिवसांत येणारे सोयाबीनला शेतकरी पसंती देऊ लागले आहेत. यंदा भाव चांगला मिळाला तर शेतकरी मालामाल होऊ शकतील आणि सोयाबीनचा पेरा वाढेल, अशी आशा आहे.
लवकर येणाऱ्या सोयाबीनचे फायदे
लवकर येणारे सोयाबीन काढणीनंतर बाजारात सोयाबीनची आवक कमी असते. त्यामुळे भाव चांगला मिळतो. शेत लवकर रिकामे झाल्याने रबी हंगामाचे चांगले नियोजन होऊ शकते. सोयाबीन काढल्यानंतरही जमिनीत ओलावा टिकून राहतो. इतर पिके घेण्यासाठी त्याचा फायदा होतो.
तीन प्रकारचे साेयाबीन घ्यावे
शेतकऱ्यांनी तीन प्रकारचे सोयाबीन घ्यावे. त्यामध्ये लवकर, मध्यम आणि उशिरा असे नियोजन करावे. त्यामुळे पाऊस केव्हाही आला तरी शेतकऱ्यांना सोयाबीन चांगले उत्पन्न देऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. ९५६० आणि २०३४ हे वाण ८५ दिवसांत तर ९३०५ हे वाण ८७ दिवसांत येतात. वेगवेगळ्या प्रकारचे वाण उपलब्ध आहेत.