पोलीस अधीक्षकांपुढे वृध्दाकडून कैफियत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 19:19 IST2019-04-30T19:18:44+5:302019-04-30T19:19:08+5:30

निवेदन : सूनेने मारहाण केल्याचा आरोप

Inspector of the superintendent of police | पोलीस अधीक्षकांपुढे वृध्दाकडून कैफियत

पोलीस अधीक्षकांपुढे वृध्दाकडून कैफियत

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : घरात घुसून शिवीगाळ करीत मारहाण केल्याने वृध्द महिला जखमी झालेली आहे़ तिची कैफियत पोलीस ऐकून घेत नाही़ त्यामुळे जखमी महिलेच्या पतीने पोलीस अधीक्षक यांच्याकडे कैफियत मांडत निवेदन सादर केले़ दरम्यान, जखमी महिलेला मारहाण करणारी सून आहे़ 
महम्मद अय्युब गुलाम महम्मद अन्सारी (रा़ फिरदोस नगर, धुळे) यांनी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना निवेदन सादर केले़ त्यानुसार, अफसानाबानो महम्मद अय्युब अन्सारी हिला तिची सून सामिया मर्द बिलाल अन्सारी हिने लाथा-बुक्याने, चापटांनी घरात घुसून मारहाण केली़ बिभित्स अशी शिवीगाळ केली़ मारुन टाकण्याची धमकीही दिली़ अशाप्रकारची घटना ४ ते ५ वेळा घडली आहे़ परंतु चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस फिर्याद घेत नाही़ दवाखान्यात सुध्दा पाठवित नाही़ पोलिसांची ही मनमानी चालु राहिल्यास जनतेने कोणाकडे जावे आणि कोणाकडे न्याय मागावा़ असा सवाल करीत जखमी महिलेची त्वरीत फिर्याद नोंदवून घेत तिला सरकारी दवाखान्यात उपचारासाठी पाठविण्यात यावे आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याला फिर्याद नोंदवून घेण्याबाबत आदेश करावा असेही निवेदना नमूद करण्यात आला आहे़ 

Web Title: Inspector of the superintendent of police