शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

‘जलमुक्त’ बंधारा कामाची प्रशासनाकडून चौकशी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:49 IST

कापडणे : दुधई नाल्यावरील फुटलेल्या बंधाºयाची अधिकाºयांकडून पहाणी

लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : येथे जलयुक्त शिवार योजनाअंतर्गत दुधई नाल्यावरील बंधाºयाची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, पहिल्याच पावसात हा बंधारा फुटल्याने जलमुक्त झाला आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त दिले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने तातडीने या बंधारा कामाची पहाणी केली.धुळे जिल्हाधिकारी कार्यालय व लघु सिंचन विभागाने या घटनेची दखल घेत २३ रोजी दुपारी कापडणे येथे भेट देऊन दुधई नाल्यावरील  फुटलेल्या बंधाºयाच्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, धुळे पंचायत समिती लघु सिंचन विभागातील कनिष्ठ अभियंता  के.डी. देवरे यांच्यासह चार ते पाच अधिकाºयांच्या पथकाने घटनास्थळी येऊन बंधाºयाची पाहणी केली. बंधाºयाची खोली, लांबी-रुंदीचे मोजमाप केले. सदर काम ईस्टीमेट प्रमाणे झाली आहे किंवा नाही, याची शहानिशा केली. बंधारा फुटला असल्यामुळे परिसरातील शेतकºयांच्या शेती वाहून मोठे नुकसान झालेले आहे. यात शेतकरी निळकंठ गंगाराम पाटील, विजय आत्माराम पाटील, बंटी पाटील, रविंद्र देवीदास पाटील, सुरेश कौतिक पाटील आदी शेतकºयांचे नुकसान झाले असून संबंधित बंधाºयाचे निकृष्ट काम  झाल्याबाबत वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, त्याचवेळी दखल न घेतल्यामुळे शेवटी बंधारा फुटल्याचे शेतकºयांनी सांगितले. संबंधित अधिकाºयांनी यासंदर्भात शेतकºयांकडून सविस्तर माहिती लेखी जबाबात घेऊन स्वाक्षºया घेतल्या आहेत.दरम्यान, यासंदर्भातील चौकशी अहवाल, शेतकºयांकडून घेतलेले जाबजबाब जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर  संबंधित ठेकेदार व प्रशासकीय अधिकाºयांवर कारवाई होण्याची शक्यता पथकातील अधिकाºयांनी व्यक्त केली.

टॅग्स :Dhuleधुळे