दोंडाईचा येथील बालिका अत्याचार प्रकरणाची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 17:26 IST2018-02-23T17:25:04+5:302018-02-23T17:26:11+5:30
मागणी : मुलायमसिंग युथ ब्रिगेड समाजवादी पार्टीतर्फे निदर्शने

दोंडाईचा येथील बालिका अत्याचार प्रकरणाची चौकशी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दोंडाईचा येथील नूतन विद्यालयात शिकणाºया पाच वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची चौकशी करावी. तसेच संबंधित बालिकेच्या माता-पित्यांवर दबाव टाकणाºयांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी मुलायमसिंग युुथ ब्रिगेड समाजवादी पार्टीतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली.
यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सरकारतर्फे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यात जिल्ह्यात मुलींवर अत्याचार होण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. त्याला पायबंद घालणे गरजेचे आहे. कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे काम सरकारचे आहे. दोंडाईचा येथील बालिका अत्याचार प्रकरणी तो नराधम जेवढा जबाबदार आहे. त्यासोबत हे प्रकरण दाबणे किंवा उघडकीस येऊ नये, म्हणून काही राजकीय नेतेमंडळी प्रयत्न करीत आहे.