विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्याचा उपक्रम कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:07 IST2021-02-06T05:07:57+5:302021-02-06T05:07:57+5:30

साक्री तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाची सभा व बक्षीस वितरण समारंभ दिघावे येथील न्यू इंग्लिश स्कूल ...

The initiative to create interest in learning among the students is commendable | विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्याचा उपक्रम कौतुकास्पद

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्याचा उपक्रम कौतुकास्पद

साक्री तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाची सभा व बक्षीस वितरण समारंभ दिघावे येथील न्यू इंग्लिश स्कूल झाला. त्यावेळी साक्री पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस.जी. निर्मल अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळनेर एज्यु.सो.चे संचालक एच.आर. गांगुर्डे, विज्ञान संघाचे जिल्हाध्यक्ष पी.झेड. कुवर, सी.गो. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे, मंडळाचे सल्लागार सुहास सोनवणे, सेवानिवृत्त कार्याध्यक्ष एस.आर. बिरारीस, मुख्याध्यापक एम.ए. बिरारीस, पत्रकार विजय भोसले, सेवानिवृत्त शिक्षक एस.डी. खैरनार, उपप्राचार्य भरत बिरारीस उपस्थित होते.

तालुकाध्यक्ष के.एस. बच्छाव यांनी विज्ञान संघाच्या कार्याचा व उपक्रमांचा आढावा प्रास्ताविकेतून स्पष्ट केला. यावेळी राज्य विज्ञान मंडळाचे सदस्य सुहास सोनवणे, कार्याध्यक्ष एस.आर. बिरारीस यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल व सी.गो. पाटील माहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे यांचा आदर्श प्राचार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वाय.ओ. बोरसे व विनोद सोनव, मुख्याध्यापक आर.आर. गांगुर्डे, व्ही.पी. पाटील, एम.ए. बिरारीस यांचा सत्कार करण्यात आला.

कोरोना कालावधीत ऑनलाइन घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा व निबंध स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने निवड झालेल्या विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तालुका उपक्रम समिती प्रमुख अविनाश सोनार यांनी निकाल जाहीर केला. यात निबंध स्पर्धा (गट ) कु. आशा साहेबराव टकले (दिघावे), कु. सिमरन जगदीश थोरात (दहिवेल), कु.ऋतिका संजय सूर्यवंशी (साक्री), दीपक गुलाब सोनवणे (तामसवाडी). निबंध स्पर्धा (गट ब) कु.महक कमर पिंजारी( म्हसदी), कु.रोशनी मुकुंदा अहिरे (बल्हाणे), कु. खुशी प्रवीण पाटील (कासारे), कार्तिक किरण मोरे (दिघावे). प्रश्नमंजूषा स्पर्धा - भूपेंद्र दिनेश पाटील व गितेश संजय देवरे(म्हसदी), सानिका खंडू हिरे व सोहन अशोक चौधरी (कासारे), कु.साक्षी सुनील देसले व कु. हर्षदा प्रशांत देवरे (म्हसदी). या स्पर्धांसाठी स्मृती चिन्हांचे प्रायोजक ए.एस. पाटील व जे.ए.पाटील यांचाही सन्मान करण्यात आला.

सुत्रसंचलन सचिव ए.एस.पाटील यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष डी.व्ही. सूर्यवंशी यांनी मानले. यावेळी उपाध्यक्ष व्ही.जी.बागुल, उपक्रमप्रमुख अविनाश सोनार, सहसचिव एस.आर.भदाणे, कोषाध्यक्ष डी.डी.महाजन, जे.ए.पाटील, सचिन जाधव,एस.एस.देसले, एच.के.देसले,एस.डी.शेवाळे, उमराव भदाणे, एस.व्ही.भामरे, एस.आर.सोनवणे, वाय.ओ.बोरसे, पी.एच.जाधव, पी.एस.साळुंके, एस.झेड.बोरसे, अरविंद घरटे, एच.आर.पाटील,आर.के.बोरसे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: The initiative to create interest in learning among the students is commendable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.