भारताने अधिक सामर्थ्यशाली व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 10:40 PM2020-01-18T22:40:42+5:302020-01-18T22:41:19+5:30

भैय्याजी जोशी । आप्पासाहेब चितळे स्मृती व्याख्यानमाला

India should be more powerful | भारताने अधिक सामर्थ्यशाली व्हावे

भारताने अधिक सामर्थ्यशाली व्हावे

Next

धुळे : भारत हा देश कधीच संपणार नाही़ सद्याची परिस्थिती पहाता भारताने अधिक प्रभावशाली होण्याची आवश्यकता आहे़ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी धुळ्यात व्याख्यानमालेत व्यक्त केले़
धुळे एज्युकेशन सोसायटीचे आप्पासाहेब चितळे स्मृती व्याख्यानमालेचे १६ वे पुष्प भैय्याजी जोशी यांनी गुंफले़ यावेळी अध्यक्षस्थानी रवि बेलपाठक तर प्रमुख पाहुणे म्हणून महेश घुगरी, संतोष अग्रवाल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते़
जोशी म्हणाले, भारत देशात स्वत:चा मार्ग निवडण्याचा अधिकार आहे़ धर्म, शिक्षण, अर्थ, कला आणि राजनैतिक असे क्षेत्र फार महत्वाचे आहे़ यात आजच्या तरुण पिढीने जागृत व संघटीतपणे सहभाग घेण्साची आवश्यकता आहे़ सत्ता ही सर्वस्व नसून समाज सर्वोतोपरी आहे़ याचे चिंतन झाले पाहीजे़
सुत्रसंचालन एस़ एस़ देवरे यांनी तर प्रास्ताविक संतोष अग्रवाल यांनी केले़ बहुसंख्य उपस्थित होते़

Web Title: India should be more powerful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे