महिलांचे बेमुदत धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 21:12 IST2021-01-04T21:12:26+5:302021-01-04T21:12:43+5:30
पुर्णवेळ अधिकारी द्या : रमाई घरकुलाचे अनुदान देण्याची मागणी

महिलांचे बेमुदत धरणे आंदोलन
धुळे : रमाई आवास योजनेच्या घरकुलांसह विविध मागण्यांसाठी माता रमाई घरकुल लाभार`थी संघर्ष समितीच्या वतीने लाभार`थी महिलांनी सोमवारपासून साक्री रोडवरील सामाजिक न्याय भवनात बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. रिपाई नेते वाल्मिक दामोदर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयामार्फत नाशिक विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यासाठी सहायक आयुक्त समाजकल्याण वर्ग १ चा पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, राष्ट्रीयकृत बॅंकेत लाभार`थी आणि समाजकल्याण अधिकारी यांचे संयुक्त खाते त्वरीत उघडावे, सन २०१९-२० करीता धुळे महानगरपालिका क्षेत्रातील पात्र लाभार`थींना रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत मनपाने कार्यादेश दिले आहेत. या लाभार`थींच्या अनुदानाचा पहिला हप्ता त्वरीत वितरीत करण्याचे आदेश मनपाला द्यावे, सन २०१८-१९ करीता ज्या लाभार`थींना प्रथम हप्ता वितरीत करण्यात आला आहे, त्या लाभार`थींना घराचे बांधकाम लिंटल लेव्हलपर्यंत केले आहे, त्या लाभार`थींना अनुदानाचा दुसरा हप्ता १ लाख रुपये अनुदान वितरीत करण्याचे आदेश द्यावे, सहायक आयुक्त डी. जी. नांदगावकर यांची बदली झाल्यामुळे लाभार`थींचे बॅंक खाते बंद करुन नवीन अधिकाऱ्यांच्या सोबत खाते उघडावे, अण्णाभाऊ साठे नगरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत मंजुर केलेल्या निधीतून त्वरीत कामे करण्याबाबत महापालिका आयुक्तांना सूचना द्याव्यात आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरुच राहील असा इशारा देण्यात आला आहे. रमाई आवाज योजनेला निधीची कमतरता आहे.