ऑनलाईनमुळे वाढले डोळ्यांचे आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 12:24 IST2021-01-01T12:24:35+5:302021-01-01T12:24:56+5:30
धुळे : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शारीरिक अंतर राखणे आवश्यक असल्याने शाळा-महाविद्यालये ठप्प झाली़ होती. पर्यायाने विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाकडे वळले़ ...

ऑनलाईनमुळे वाढले डोळ्यांचे आजार
धुळे : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शारीरिक अंतर राखणे आवश्यक असल्याने शाळा-महाविद्यालये ठप्प झाली़ होती. पर्यायाने विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाकडे वळले़ मात्र आता ऑनलाईन शिक्षणाचेही गंभीर परिणाम समोर येवू लागले आहेत़. ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक मुलांमध्ये डोळ्यांचे आजार वाढले असून पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. या शिक्षण पध्दतीमुळे मुले एकलकोंडे होत असून मानदुखी, पाठदुखीसह डोळ्यांच्याही तक्रारी वाढल्या असल्याने आता पालकांचीही चिंता वाढली आहे़.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉम्प्युटर, पॅड, टँबलेट, स्मार्ट फोन आदींच्या माध्यमातून मुले ऑनलाईन शिक्षणाकडे वळली आहेत. आधुनिक साधने हाताळण्याचे ज्ञान विद्यार्थ्यांना या पध्दतीमुळे प्राप्त झाले असले आणि या ज्ञानाचा हे विद्यार्थी वैयक्तिक जीवनातही वापर करू लागले असले तरी ५ ते ६ तास पुस्तक वाचल्यानंतर जेवढा डोळ्यावर ताण येतो, तेवढाच ताण एक तास मोबाईल पाहण्याने येतो असे तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे़. याचा प्रत्यय आता येवू लागला आहे़. बालरोग तज्ञांकडे येणाऱ्या मानदुखी, पाठदुखीबरोबरच डोळ्यांच्या विविध विकारांच्या बालरुग्णांमधे वाढ झाली आहे. डोळे दुखणे, थकवा, चिडचिड अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी असल्याचे सांगण्यात आले़. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाला पर्याय नसेल तर किमान त्याचा वर्ग २० मिनिटांपेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता पालकांनी घ्यायला हवी.
ऑनलाईन शिक्षणामुळे मानदुखी, पाठदुखीबरोबरच डोळ्यासंबंधीच्या तक्रारी वाढल्या आहेत़ एवढेच नव्हे तर या शिक्षण पध्दतीमुळे विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होत असून स्मरणशक्तीही कमी होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे़ याबरोबरच मुले एकलकोंडी तसेच रागीट होत असून चिडचिडेपणा वाढत आहे.