शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

कांदा लागवड क्षेत्रात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 1:34 PM

 लोकमत न्यूज नेटवर्क मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरातील शेतकरी दरवर्षी पाण्याअभावी खरीप हा एकमेव हंगाम येथील घेत होते. ...

 लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरातील शेतकरी दरवर्षी पाण्याअभावी खरीप हा एकमेव हंगाम येथील घेत होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून येथील अमरावती मध्यम प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरल्याने विहिरींसह जमिनीतील जलस्रोत चांगलाच वाढला आहे. यामुळे खरीपापेक्षा रब्बी हंगामातील क्षेत्रफळात येथे वाढ होत आहे. उजव्या व डाव्या कालव्याच्या आजूबाजुला देखील बागायती शेतजमिनीत वाढ होताना दिसून येत आहे. यंदा रांगडा कांद्याचे क्षेत्रफळ वाढणार असल्याचे दिसून येत आहे.कांदा हे सर्वात जास्त पाण्याचे पिक आहे. येथे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यामुळे व बाजारात कांद्याला चांगला भाव असल्याने येथील शेतकर्‍यांनी उन्हाळी रांगडा कांद्याला पसंती दिली असून त्यासाठी लागणारे रोपे चांगलीच वाढीस लागली आहेत. साधारणत: रोप तयार झाल्यावर पुढील आठवड्यात रांगडा कांद्याच्या लागवडीस सुरुवात होईल. यावर्षी मालपूरसह सुराय, चुडाणे, अक्कलकोस, सुराय, कर्ले, परसोळे, देवी, सतारे, वैंदाणे, ऐचाळे, शनिमांडळ आदी भागात रांगडा कांद्याच्या क्षेत्रफळात वाढ झाल्याचे शेतकऱ्यांनी टाकलेल्या कांदा रोपावरुन व लागवडीसाठी राखून ठेवलेल्या शेत जमिनीवरुन दिसून येत आहे.येथील शेतकऱ्यांनी चार ते पाच हजार रुपये प्रतिकिलो किंमतीचे महागडे कांदा बियाणे लागवडीसाठी रोप म्हणून टाकले आहे. साधारणत: दोन महिन्याचे रोप झाल्यानंतर लागवड होत असते. त्यामुळे कांदा लागवडीच्या हालचाली शेतशिवारात दिसून येत आहे.खरीपातील कांद्याने यावर्षी येथील शेतकर्‍यांना दगा दिला. बुरशीजन्य आजारामुळे उत्पादनात मोठी घट आली. कांद्याची पात चांगली वाढीस लागलीच नाही. एकरी फक्त पाच क्विंटल उत्पादन निघाल्यामुळे त्यातून खर्च देखील निघाला नाही. खरीपातील कसर रब्बीत काढण्यासाठी येथील कांदा उत्पादक शेतकरी सरसावले असून मालपूरसह परिसरात कांदा उत्पादनात वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. मालपूर येथे बेड, सर पध्दतीने तसेच गादी वाफ्यावर कांद्याची लागवड करतात. काही शेतकरी ठिंबक सिंचनाचा देखील आधार घेतात. तर काही स्प्रिंगकलरचा उपयोग करुन कांद्याचे चांगले उत्पादन घेत असतात. रांगड्या कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव कमी जाणवतो. म्हणून हमखास उत्पन्न हाती लागते. कांदा हे नगदी पीक असून कांदा उत्पादनातून येथे बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रगती साधली आहे.