बस बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST2021-02-05T08:46:40+5:302021-02-05T08:46:40+5:30

कोरोना लॉकडाऊन काळात अनेक व्यवसाय बंद झाले होते. त्यात ही बस ही बंद करण्यात आली होती. धुळे ते आयने ...

Inconvenience to students due to bus closure | बस बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

बस बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

कोरोना लॉकडाऊन काळात अनेक व्यवसाय बंद झाले होते. त्यात ही बस ही बंद करण्यात आली होती. धुळे ते आयने बस ही सायंकाळी ६:०० वाजता येत होती. ही बस बंदच असल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे. खंडलाय, शिरधाने, आयने या भागांतील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी व युवक हे शिक्षणासाठी कुसुंबा, नेर येथे जात असतात. वाहतुकीची सध्या साधन उपलब्ध नसल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनींचे, तसेच विशेष युवक-युवतींना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे धुळे ते खंडलाय आयने सायंकाळची ६:०० वाजेची मुक्कामाची बस पूर्वरत सुरू करावी, अशी मागणी अरुण गुलाबराव भदाणे, प्रमोद प्रभाकर भदाणे, कुणाल भदाणे, धिरज जाधव, अभिषेक देवरे, रोहित नेरकर, अमोल भदाणे, शुभम भदाणे, रोहित माळी, चेतन हालोर, प्रमोद भदाणे, जगदीश पाटील, दानिश पिंजारी, संतोष बागुल, जगदीश बागुल, मयूर चव्हाण, अरुण पाटील, उमेश पाटील, मोहन पाटील, गौरव बच्छाव, विठ्ठल दास बैरागी, दीपक बागुल, योगेश भदाणे, जयेश बागुल, विकास भिल, विजय बच्छाव, नीलेश शिंदे, भूषण शिंदे, दिनेश निंबा भदाणे यांनी केली आहे. विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Web Title: Inconvenience to students due to bus closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.