अतिक्रमणामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:33 IST2021-01-13T05:33:58+5:302021-01-13T05:33:58+5:30

महानगरात आपल्या दारी ही माेहीम राबवण्यात येत आहे. माेहिमेत शुक्रवारी सकाळी सभापती यांनी प्रभाग क्रमांक चारमधील इंदिरा गार्डन, आनंदनगर ...

Inconvenience to local citizens due to encroachment | अतिक्रमणामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय

अतिक्रमणामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय

महानगरात आपल्या दारी ही माेहीम राबवण्यात येत आहे. माेहिमेत शुक्रवारी सकाळी सभापती यांनी प्रभाग क्रमांक चारमधील इंदिरा गार्डन, आनंदनगर या भागात पाहणी करीत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यात. त्यात इंदिरा गार्डन परिसर, प्राेफेसर काॅलनीतील समस्यांबाबत नागरिकांकडून तक्रारी करण्यात आला. तसेच या भागातून जाणाऱ्या लाेंढी नाल्याच्या आजूबाजूच्या असणाऱ्या नागरिकांनी नाल्यास संरक्षण भिंत बांधण्याबाबत मागणी केली. त्याठिकाणी रहिवाशांनी अतिक्रमण केल्याने नाल्यांची रुंदी कमी झाल्याने प्रत्येक पावसाळ्यात नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात घुसून वित्तीय हानी हाेत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. तसेच काही भागांत गटारीवरील राेडक्राॅस गटार करणे, चेंबरमध्ये अडकलेली घाण काढणे आदीच्या तक्रारी सोडविण्यात आल्या. यावेळी अभियंता कैलास शिंदे, पी. डी. चव्हाण यांना तत्काळ याबाबत अंदाजपत्रक तयार करून काम सुरू करण्याचे आदेश दिले. याप्रसंगी सभापतीसह प्रभागातील नगरसेविका प्रतिभा चाैधरी, पुष्पा बाेरसे, सुनीता पवार, उषा चाैधरी, अभय वाघमारे, अशाेक पाटील, राजेंद्र बाेरसे, भावराज बाेरसे आदी उपस्थित हाेते.

Web Title: Inconvenience to local citizens due to encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.