दुचाकीने जाणाऱ्या वृद्धाला अडवून ४५ हजार हिसकावले रामी फाट्यावरील घटना; दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 05:35 PM2024-04-27T17:35:45+5:302024-04-27T17:36:09+5:30

यात जखमी झाल्यानंतर उपचार घेऊन दोंडाईचा पोलिस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दाखल झाली. त्यानुसार, जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला.

Incident on Rami Phata: 45,000 was snatched from an old man on a two-wheeler; The crime of forcible theft against both | दुचाकीने जाणाऱ्या वृद्धाला अडवून ४५ हजार हिसकावले रामी फाट्यावरील घटना; दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा

दुचाकीने जाणाऱ्या वृद्धाला अडवून ४५ हजार हिसकावले रामी फाट्यावरील घटना; दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा

धुळे (राजेंद्र शर्मा) : दुचाकीने जात असलेल्या वृद्धाला अडवून मारहाण करत त्याच्याजवळील ४५ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन एका महिलेसह पुरुषाने पोबारा केला. ही घटना शिंदखेडा तालुक्यातील पीरबर्डीजवळील रामी फाट्यासमोर असलेल्या कच्चा रस्त्यावर १२ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली. यात जखमी झाल्यानंतर उपचार घेऊन दोंडाईचा पोलिस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दाखल झाली. त्यानुसार, जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला.

बारकू रामचंद्र गायकवाड (६०, रा. छडवेल कोर्डे, ता. साक्री) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, दुचाकीने जात असताना पाठीमागून आलेल्या दोघांनी रस्तात अडविला. शिवीगाळ करत दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. यात डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत असतानाच खिशातून ४५ हजार रुपयांची रोकड काढून पोबारा केला. जखमी अवस्थेत बारकू गायकवाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. याप्रकरणी त्यांनी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता दोंडाईचा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली. त्यानुसार, संगीता विनोद गायकवाड (३५, रा. जांभोरा, ता. साक्री) आणि शिवदास हिरादास साबळे (४०, रा. आमोदे, ता. साक्री) यांच्या विरोधात भादंवि कलम ३९२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Incident on Rami Phata: 45,000 was snatched from an old man on a two-wheeler; The crime of forcible theft against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.