कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्रमाण घटले, सहा रुग्णांना तीव्र लक्षणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:32 IST2021-02-15T04:32:13+5:302021-02-15T04:32:13+5:30
मागील काही आठवड्यांपासून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी - अधिक होत आहे. रुग्णसंख्या कधी १०० पेक्षा कमी होते. तर ...

कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्रमाण घटले, सहा रुग्णांना तीव्र लक्षणे
मागील काही आठवड्यांपासून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी - अधिक होत आहे. रुग्णसंख्या कधी १०० पेक्षा कमी होते. तर काही दिवसांनी त्यात पुन्हा वाढ होऊन रुग्णसंख्या १५० चा टप्पा ओलांडते. अशीच स्थिती तालुक्यांच्या बाबतीतही आहे. साक्री, शिरपूर व शिंदखेडा या तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या अनेकदा १ पर्यंत खाली आली होती. त्यामुळे हे तालुके कोरोनामुक्त होतील असे वाटत होते. मात्र त्यानंतर तेथे पुन्हा रुग्ण आढळल्याने कोरोनमुक्त तालुका होऊ शकला नाही. साक्री तालुका कोरोनमुक्त झाला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा रुग्ण आढळल्याने कोरोनामुक्तीचा आनंद फार काळ टिकू शकला नाही.
धुळे शहरात सर्वाधिक रुग्ण -
धुळे शहरात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. सध्या ८९ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी बहुतांश रुग्ण गृह विलगीकरणात असल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर धुळे शहर सर्वात मोठे हॉटस्पॉट ठरले होते. आतादेखील शहरात दररोज पाच ते सहा रुग्ण आढळत आहेत.
शिरपूर तालुक्यात केवळ दोन रुग्ण -
शिरपूर तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या पुन्हा कमी झाली आहे. आता तालुक्यातील केवळ दोन बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या आधीही तालुक्यातील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दोनपर्यंत खाली आली होती. आता रुग्ण आढळले नाहीत तर जिल्ह्यातील पहिला कोरोनामुक्त तालुका होऊ शकतो. धुळे तालुक्यातील १७ जणांवर उपचार सुरू आहेत. शिंदखेड्यात ५ तर साक्री तालुक्यात १४ बाधित रुग्ण आहेत.
६२ रुग्णांना लक्षणे नाहीत -
सद्या उपचार घेत असलेल्या १२७ पैकी ६२ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. सहा रुग्णांना तीव्र स्वरूपाची लक्षणे जाणवत आहेत तर ३४ रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. २५ रुग्णांना माध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत.