शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसामुळे अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 12:08 IST

ठिकठिकाणी जलपूजन : नदी, नाले, बंधारे आणि धरणही तुडूंब, शिंदखेडा तालुक्यातील चुडाणे, सुराय येथील पाणी टँकर बंद

धुळे- जिल्ह्यात अपवाद वगळता संततधार पाऊस सुरूच आहे. यामुळे नदी, नाले, बंधारे आणि धरणही ओसंडून वाहत आहे. यामुळे अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. दरम्यान साक्री तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पांझरा, बुराई नद्यांसह नाल्यांना मोठे पूर आले आहेत. शिंदखेडा तालुक्यातील चुडाणे, सुराय येथील पिण्याच्या पाण्याचा टँकर बंद झाला आहे.साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शनिवारी सकाळपासूनच ‘ओव्हर फ्लो’ झाले. त्यामुळे पिंपळनेर येथे पांझरा नदीस मोठा पूर आला. हे पाणी अक्कलपाडा धरणात पोहचले. अक्कलपाडा धरणही ओसंडून वाहू लागल्याने धरणाचे गेट उघडण्यात आले आहे. दरम्यान, पांझरा नदीच्या पुरामुळे मलांजन, देगाव आदी गावांचा संपर्क तूर्तास तुटला आहे. जून महिन्यात झालेल्या पावसानंतर पावसाने दडी मारली. यामुळे पेरण्या केलेले शेतकरी दुबार पेरणीच्या भीतीने संकटात सापडले होते. मात्र पंधरवड्यानंतर पावसाचे पुनरागमन झाले. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले. तसेच उर्वरीत पेरण्यांचे कामही आटोपले आहे. सध्या पिकांची जोमदार वाढ होत असून संततधार पाऊस सुरु आहे. पिंपळनेर येथे रस्ते व पुलांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने स्थानिक प्र्रशासनांनी नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. पिंपळनेर शहरात पुरामुळे नदीलगत असलेल्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मालपूर परिसरात गावांचा पाणीप्रश्न मार्गी*मालपूर- शिंदखेडा तालुक्यातील मालपूर परिसरात होत असलेल्या दमदार पावसामुळे चुडाणे येथील पाण्याचे टॅँकर बंद झाले. तर सुरायचा पाणी टंचाईचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे.*मालपूरसह परिसरातील सुराय, चुडाणे, अवकलकोस, कलवाडे, कर्ले, परसोळे, देवकानगर, वैंदाणे या भागात ४ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून दमदार पाऊस होत आहे. ४पहाटेच्या सुमारास या परिसराला पावसाने झोडपून काढले. झालेल्या पावसामुळे जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या बंधाºयांमध्ये पाणी साठले आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.*शिंदखेडा तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाईचा सामना चुडाणे- सुराय या गावांना करावा लागतो. चुडाणे येथे गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ्यातही पाण्याचे टॅँकर सुरू होते. मात्र गावालगत झालेले सर्वच बंधारे भरल्याने, गावविहिरीला पाणी आले. त्यामुळे येथील पाण्याचे टॅँकर बंद करण्यात आल्याचे गावकºयांचे म्हणणे आहे. *सुराय गावालाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र होत असलेल्या दमदार पावसामुळे गावाला पाणी पुरवठा करणारी विहिर तुडूंब भरल्याने, गावाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. ४मालपूर गावातही रविवारी  पहाटेपासून येथे पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे जलयुक्त शिवारअंतर्गत झालेल्या बंधाºयांमध्ये पाणी साचले आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी समाधानी आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे