शिंदखेडा रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:41 IST2021-07-14T04:41:10+5:302021-07-14T04:41:10+5:30
या कार्यक्रमास रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष भागचंद जैन व सचिव विजय जाधव यांच्याकडील धुरा नूतन अध्यक्ष गोपालसिंग परमार ...

शिंदखेडा रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा साजरा
या कार्यक्रमास रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष भागचंद जैन व सचिव विजय जाधव यांच्याकडील धुरा नूतन अध्यक्ष गोपालसिंग परमार व सचिव संदीप अहिरराव यांच्याकडे रोटरी क्लब ३,०६० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संतोष प्रधान व सुनेत्रा प्रधान, डिस्ट्रिक्ट चीफ सेक्रेटरी कमरभाई शेख यांनी सुपूर्द केली. डॉ. प्रा. पी. व्ही. बाविस्कर यांनी ग्लोबल वॉर्मिंग यावर विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी जाधव नगरचे फलक अनावरण व शिंदखेडा बाजार समितीच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास नगर पंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर रोटरीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी चेअरमन संजय पारख, संजयकुमार महाजन उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाळकृष्ण बोरसे, विकी चंदनानी, देवेंद्र नाईक, परीक्षित देशमुख, मयूर ओसवाल, सुमित जैन, विनोद जैन, डॉ. सुजय पवार, डॉ. विनय पवार यांनी अनमोल सहकार्य केले. सूत्रसंचलन हर्षल अहिरराव, महेंद्र पाटील यांनी केले. आभार संदीप अहिरराव यांनी मानले.