दुसाणे ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंच पद्ग्रहण समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:42 IST2021-02-20T05:42:01+5:302021-02-20T05:42:01+5:30
सकाळी साडेदहा वाजता ग्रामपंचायत कार्यालय आयोजित पदग्रहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यात सौ. सुशिलाबाई ठाकरे यांना सरपंच पदाचा तर कु.चारुशीला ...

दुसाणे ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंच पद्ग्रहण समारंभ
सकाळी साडेदहा वाजता ग्रामपंचायत कार्यालय आयोजित पदग्रहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यात सौ. सुशिलाबाई ठाकरे यांना सरपंच पदाचा तर कु.चारुशीला भदाणे यांना उपसरपंच पदाचा पदभार ग्रामपंचायत कार्यालयामार्फत सन्मानाने देण्यात आला. त्यावेळी कार्यालय प्रमुख व लिपिक राजेंद्र सोनार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला.तेव्हा लिपिक यांनी पहिल्याच दिवशी घरकुलांच्या नवीन प्रस्तावांवर सरपंच व उपसरपंच यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन कामाला सुरुवात करून घेतली. त्या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य वसंत महाले यांनी कार्यालयात व आवारात कुणीही धूम्रपान करणार नाही,अशी सूचना मांडली व त्याला सर्व उपस्थितांनी मान्यता दिली.
त्यानंतर संध्याकाळी संयम पथ संघटन आयोजित शपथग्रहण व या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी केलेल्या सर्वांचा सन्मान व सत्कार या संघटनेचे पदाधिकारी संतोष भदाणे,प्रशांत महाले, भगवान भदाणे,नवनाथ भदाणे,राहुल भदाणे,पप्पू महाले,जितेंद्र महाले यांनी केला त्यानंतर सरपंच उपसरपंच व सर्व नवनिर्वाचित सदस्यांना गटनेते हेमंत खैरनार यांनी एकत्रित शपथ दिली.त्यानंतर गावात ठीक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली.
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अक्षय सोनवणे,उपसरपंच चारुशीला भदाणे,धुळे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा नाना भदाने व या संघटनेचे मार्गदर्शक रोहित पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सर्व जनतेचे आभार पंकज भदाणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.आर.सूर्यवंशी यांनी केले या कार्यक्रमात सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली