आॅनलाइन लोकमतधुळे : येथील जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीत धुळे बार असोसिएशनच्या कार्यालयाचे उदघाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्या हस्ते व बार असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप जी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले.उत्तर महाराष्टÑात अशा प्रकारचे पहिलेच कार्यालय आहे. बाहेर गावाहनू येणारे न्यायाधीश अधिकारी, वकील यांना तसेच बार असो.च्या महत्वाच्या बैठका घेण्यासाठी या कार्यालयचा उपयोग होणार आहे. यावेळी न्या. डॉ. श्रृष्टी निळकंठ, न्या.क्षिरसागर, न्या. उगले, न्या. चव्हाण, न्या. सय्यद, न्या. बांगर, जिल्हा सरकारी वकील अॅड. देवेंद्र तवर, सर्वश्री अॅड. जी.व्ही. गुजराथी, एम.एस. पाटील,यू.एस. लोखंडे, बापू मेहता, ए.एम. देसर्डा, डी.वाय.खैरनार, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. मधुकर भिसे, सचिव अॅड.विवेक सूर्यवंशी, सुरेश बच्छाव आदी उपस्थित होते.
धुळे जिल्हा न्यायालयात बार असोसिएशनच्या कार्यालयाचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 12:19 IST
उत्तर महाराष्टÑातील पहिलेच कार्यालय
धुळे जिल्हा न्यायालयात बार असोसिएशनच्या कार्यालयाचे उदघाटन
ठळक मुद्देजिल्हा सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्याहस्ते झाले उदघाटनउत्तर महाराष्टÑातील पहिलेच कार्यालयअनेकांची होती उपस्थिती