स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:22 IST2021-07-05T04:22:49+5:302021-07-05T04:22:49+5:30
या केंद्रामार्फत हवामानबदल अनुकूलन कार्यक्रम राबविला जात आहे. यात मृदा व जलसंवर्धन, मातीपरीक्षण, गाव कृषी सल्ला केंद्र, गांडूळ खत ...

स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन
या केंद्रामार्फत हवामानबदल अनुकूलन कार्यक्रम राबविला जात आहे. यात मृदा व जलसंवर्धन, मातीपरीक्षण, गाव कृषी सल्ला केंद्र, गांडूळ खत युनिट, परसबाग, मृदा पोषण व्यवस्थापनांतर्गत समतल चर, वृक्षारोपण, स्थानिक नागरिक क्षमता विकास व प्रशिक्षण यासारखे विविध उपक्रम राबविले जात आहेत. या प्रकल्पासाठी स्थानिक पातळीवर वर्षीगढ पाणलोट विकास समिती स्थापन करण्यात आली आहे.
या प्रकल्पातील गावकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी, वातावरणात होणाऱ्या बदलाची माहिती अगोदर मिळावी, याकरिता स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले आहे. त्याद्वारे गावातील शेतकऱ्यांना दररोज हवामानाचा अंदाज मोबाइलवर एक मेसेज व एका कॉलद्वारे घरबसल्या मिळणार आहे. यामुळे परिसरातील शेतकरी आपले शेतीचे नियोजन व बदल करून आपले होणारे नुकसान टाळू शकतील.
याप्रसंगी डॉ. तुळशीराम गावित, डॉ. टिलेश गावित, सरपंच हिराबाई विजय चौरे, उपसरपंच हिलाल देसाई, वर्षीगढ पाणलोट विकास समितीचे अध्यक्ष सुनील चौरे, उपाध्यक्ष विश्वास साबळे, जिल्हा परिषद सदस्य छगन राऊत, ग्रामविकास अधिकारी गांगुर्डे, कृषी सहायक, वेंडाइत, कृषी पर्यवेक्षक भदाणे, आनंदा सूर्यवंशी, अजित बागुल व शेतकरीवर्ग यांनी प्रकल्पाची पाहणी करून त्याविषयी माहिती घेतली.
सदर उपक्रमास नाबार्डचे धुळे जिल्हा व्यवस्थापक विवेक पाटील, लुपिन फाउंंडेशनचे धुळे जिल्हा प्रकल्पप्रमुख योगेश राऊत व प्रकल्प समन्वयक निलेश पवार, क्षेत्र समन्वयक रोहित दाभाडे, मनोज एखंडे, व वर्षीगढ पाणलोट विकास समितीच्या सदस्यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.