करंझटी येथे स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:24 IST2021-07-04T04:24:26+5:302021-07-04T04:24:26+5:30

या प्रकल्पातील गावकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी, वातावरणात होणाऱ्या बदलाची माहिती अगोदर मिळावी याकरिता स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले ...

Inauguration of Automated Meteorological Center at Karanjati | करंझटी येथे स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्‌घाटन

करंझटी येथे स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्‌घाटन

या प्रकल्पातील गावकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी, वातावरणात होणाऱ्या बदलाची माहिती अगोदर मिळावी याकरिता स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले आहे. त्याद्वारे गावातील शेतकऱ्यांना दररोज हवामानाचा अंदाज मोबाइलवर एक मेसेज व एका कॉलद्वारे घरबसल्या मिळणार आहे. यामुळे परिसरातील शेतकरी आपले शेतीचे नियोजन व बदल करून आपले होणारे नुकसान टाळू शकतील.

याप्रसंगी डॉ. तुळशीराम गावित, डॉ. टिलेश गावित, सरपंच हिराबाई विजय चौरे, उपसरपंच हिलाल देसाई, वर्षीगढ पाणलोट विकास समितीचे अध्यक्ष सुनील चौरे, उपाध्यक्ष विश्वास साबळे, जिल्हा परिषद सदस्य छगन राऊत, ग्रामविकास अधिकारी गांगुर्डे, कृषी सहायक, वेंडाइत, कृषी पर्यवेक्षक भदाणे, आनंदा सूर्यवंशी, अजित बागूल व शेतकरीवर्ग यांनी प्रकल्पाची पाहणी करून त्याविषयी माहिती घेतली.

सदर उपक्रमास नाबार्डचे धुळे जिल्हा व्यवस्थापक विवेक पाटील, लुपीन फाउंडेशनचे धुळे जिल्हा प्रकल्पप्रमुख योगेश राऊत व प्रकल्प समन्वयक नीलेश पवार, क्षेत्र समन्वयक रोहित दाभाडे, मनोज एखंडे व वर्षीगढ पाणलोट विकास समितीच्या सदस्यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.

फोटो -

साक्री तालुक्यातील करंझटी येथे स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्‌घाटनप्रसंगी आमदार मंजुळा गावित, डॉ. तुळशीराम गावित सरपंच, उपसरपंच, सदस्य व शेतकरी.

Web Title: Inauguration of Automated Meteorological Center at Karanjati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.