उपलब्ध बेडची माहिती देणारे पोर्टल कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:37 IST2021-04-09T04:37:50+5:302021-04-09T04:37:50+5:30
अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, महापाैर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख, भाजपचे अनुप अग्रवाल, उपायुक्त शांताराम गोसावी, सभागृह नेते राजेश ...

उपलब्ध बेडची माहिती देणारे पोर्टल कार्यान्वित
अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, महापाैर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख, भाजपचे अनुप अग्रवाल, उपायुक्त शांताराम गोसावी, सभागृह नेते राजेश पवार, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
यासंदर्भात आयुक्त शेख यांनी माहिती दिली. शहरात कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ऐनवेळी खासगी आणि शासकीय रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले आहे. परिणामी रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना बेडसाठी फिरफिर करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या जुन्या इमारतीत कोविड सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात आला.
त्यानंतर गुरुवारी धुळे कोविड हाॅस्पिटल डाॅट काॅम या पोर्टलचे लोकार्पण करण्यात आले. त्याचे उद्घाटन पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. या पाेर्टलद्वारे नागरिकांना घरबसल्या आपल्या मोबाईलवर उपलब्ध बेडची माहिती मिळणार आहे.
महापालिकेचे कर्मचारी संबंधित हाॅस्पिटलकडून दररोज अद्ययावत माहिती घेऊन ते या पोर्टलवर अपडेट करतील. त्यामुळे नागरिकांनी या पोर्टलचा लाभ घ्यावा, असेही आवाहन आयुक्तांनी धुळेकर नागरिकांना केले आहे.