रोगप्रतिकारक शक्ती करेल कोरोनाचा प्रतिबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 22:03 IST2020-03-17T22:02:58+5:302020-03-17T22:03:25+5:30
तज्ज्ञांचे मत : धन्वंतरी मेडीकल फाऊंडेशन, अग्रवाल समाजातर्फे जनजागृती कार्यक्रम

dhulle
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : ज्या व्यक्तींमध्ये प्रतिकार शक्ती चांगली आहे अशांना कोरोनाचा फारसा त्रास होत नाही, म्हणून प्रतिकार शक्ती वाढवावी असे मत, धन्वंतरी मेडीकल फाऊंडेशन व अग्रवाल समाजाच्या संयुंक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कोरोना जनजाग्रुती अभियानात मान्यवरांनी व्यक्त केले. धुळयातील अग्रवाल विश्राम भवन येथे झालेल्या या कार्यशाळेत डॉ़ मंदार म्हसकर, डॉ़ जगदिश गिंदोडिया, डॉ़ संगिता गिदोडीया यांनी कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या आजाराची लक्षणे, सावधगिरी, प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमात अग्रवाल समाजाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, दिनेश गिंदोडिया, निरंजन भतवाल, महेश घुगे, माजी अधिक्षक आभियंता हिरालाल ओसवाल यांची प्रमुख ऊपस्थिती होती.
कोरोना संदर्भात माहिती देतांना, डॉ. मंदार म्हसकर म्हणाले, विविध माध्यमातून कोरोनाविषयी निर्माण झालेले चित्र भयावह आहे. केवळ भीतीने गर्भगळित होऊन चुकीचे मार्ग अवलंबन्याऐवजी शास्त्रीय माहितीच्या आधारे सतर्क राहून प्रतिबंध केला पाहिजे. प्रभावी औषधांच्या अभावामुळे प्रतिबंध हाच खरा उपाय आहे़ प्रतिबंधात्मक ऊपाय योजनांची डॉ़ म्हसकर यांनी सविस्तर माहिती दिली़
आयुर्वेद ही भारताला मिळालेली मोठी देणगी आहे. आयुवेदात सांगितलेल्या दिनचर्यचे पालन केल्यास रोगप्रतिकारशक्ती आपोआप वाढते व कोरोना सारख्या विषाणूंचा प्रतिबंध करता येतो, असे प्रतिपादन धन्वंतरी मेडिकल फाऊंडेशनच्या सचिव डॉ.संगिता गिंदोडिया यांनी केले.
धन्वंतरी मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष, त्वचा रोग तज्ज्ञ तथा योग शिक्षक डॉ़ जगदिश गिंदोडीया यांनी निरोगी राहण्यासाठी योग, हास्य योग, प्राणायामाचे महत्व विषद केले. पुर्ण दिवसातला काही वेळ नियमित योग व प्राणायाम करणे, सकस आहार, शारीरिक स्वच्छता इत्यादींचे पालन केले तर कोरोनाच काय, कुठल्याही व्याधीचा आपण प्रतिकार करू शकतो, असे डॉ. गिंदोडिया म्हणाले. यावेळी संजय गिंदोडिया यांनी आपले घर व परिसर शुध्द रहाण्यासाठी, आपल्या परिसरातील आॅक्सीजनचे प्रमाण वाढविण्यासाठी अग्निहोत्रचा विधी व महत्व विशद केले. महेश घुगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यशाळेला धुळेकर नागरिकांची अभूतपूर्व ऊपस्थिती लाभली.
रोगप्रतिकारक औषधे मोफत
प्रतिबंधात्मक ऊपाय म्हणून केंद्रिय आयुष मंत्रालयाने प्रमाणित केलेले होमीओपॅथीचे औषधे वितरीत करण्यात आली़ हे औषध गिंडोदिया हॉस्पिटल दत्त मंदिर देवपूर धुळे येथे रोज दुपारी दोन ते पाच या वेळेत मोफत उपलब्ध करुन देण्यात आले आहे़