शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
3
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
4
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
5
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
6
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
7
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
8
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
9
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
10
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
11
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
12
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
14
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
15
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
17
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
18
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
19
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
20
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   

पाणी गळत्यांची अखेर होणार दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:23 IST

महापालिका : १२ मिनिटांच्या सभेत २७ विषय मंजूर

धुळे : शहरात सध्या व्हॉल्व व जल वाहिन्यांना लागलेल्या असंख्य गळत्यांमुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. त्या गळती थांबविण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने प्रसिध्द केले होते़ त्याची दखल घेऊन मनपा स्थायी समितीच्या गुरूवारी झालेल्या बैठकीत या गळत्यांच्या दुरूस्तीसाठी ५ लाख ६१ हजार २३८ रूपये निधीची तरतूद करण्यात आली़मनपाची स्थायी समितीची बैठक गुरूवारी सकाळी ११ वाजता घेण्यात आली़ यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य व अधिकारी उपस्थित होते़ यावेळी सभेत २७ विषयांना मंजुरी देण्यात आली़शहरातील गळत्या व लिकेजव्दारे लाखो लीटर पाण्याची नासाडी होते़ त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते़ मनपा प्रशासनाने तत्काळ दुरू्स्तीसाठी उपाययोजना कराव्या, अशी अपेक्षा नागरिकांनी केली होती़ स्थायी समितीच्या सभेत पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी पाच विषयांना मंजूरी देण्यात आली़ तापी पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी जीर्ण झाल्याने लिकेज काढण्यासाठी ८१ हजार ६२१ रूपये तर कार्याेत्तर खर्च ८९ हजार ६२१ रूपये मंजूरी मिळाली आहे़ देवपुर येथील अमरधान येथे बोअरवेल करून पंप सेट व पाण्याच्या टाकीसाठी ८९ हजार ६०० रूपये तसेच शहरातील विविध प्रभागातील एअर व्हॉल बसविण्यासाठी २ लाख ८५ हजार ९५१ रूपये असा एकूण जलवाहिनी, व्हॉल्ह व नवीन कामांसाठी ५ लाख ६१ हजार २३८ रूपये निधी मंजूर करण्यात आला़या विषयांना मिळाली मंजुरीराजीव गांधी नगरातील शौचालय, देखभाल दुरूस्ती़, प्रभाग ३४ मध्ये शौचालय देखभाल दुरूस्त, देवपूर येथील निवडणूक कार्यालयाची दुरूस्ती, शिकाऊ उमेदवारांना विद्या वेतन अदा करणे, आरोग्य सेविकांच्या मानधनात वाढ, मनपा इमारतीतील फर्निचर व्यवस्था खर्चास मान्यता देण्यात आली़ठेकेदारांची गुणवत्ता तपासाडांबरीकरण रस्त्यासाठी एकाच ठेकेदाराला ठेका देण्यात आला आहे़ त्या ठेकेदराची गुणवत्ता व आर्थिक क्षमता तपासुन ठेकेदाराला ठेका देण्यात यावी अशी मागणी केली होती़ बैठकीत सभापती पाटील,अमिन पटेल, सुभाष जगताप, सुरेखा उगले, नागसेन बोरसे, संतोष खताळ आदींनी मते मांडली़

टॅग्स :Dhuleधुळे