मोहाडी पोलिसांनी पकडली अवैध विदेशी दारु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 12:05 IST2018-07-20T12:04:07+5:302018-07-20T12:05:10+5:30
मध्यप्रदेशाकडून गुजरातकडे जात होती दारु : ट्रकसह ७२ लाखाचा मुद्देमाल

मोहाडी पोलिसांनी पकडली अवैध विदेशी दारु
ठळक मुद्देमोहाडी पोलिसांनी रोखली दारुची तस्करी५२ लाखांची विदेशी अवैध दारु आणि ट्रक जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मध्यप्रदेशाकडून गुजरातकडे जाणारा विदेशी दारुचा ट्रक मोहाडी पोलिसांनी पकडला़ ५२ लाखांची अवैध विदेशी दारु आणि २० लाखांचा ट्रक असे एकूण ७२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली़ १० चाकी ट्रकच्या माध्यमातून अवैध दारु खोक्यात पॅक करुन घेऊन जात होती़ हा ट्रक मध्यप्रदेशाकडून गुजरातकडे जात होता़ दारुची ही तस्करी मोहाडी पोलिसांनी वेळीच रोखली आहे़ याप्रकरणी मोहाडी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे़