साक्रीत वादळ तर पिंपळनेरला पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 11:41 IST2019-06-12T11:40:36+5:302019-06-12T11:41:36+5:30
साक्री : तालुक्यात साक्री शहरासह काटवान परिसरात वादळी वाºयासह पाऊस झाला़ तर, पिंपळनेर येथे वादळ नव्हते़ परंतु १० ...

साक्रीत उन्मळून पडलेले वृक्ष
साक्री : तालुक्यात साक्री शहरासह काटवान परिसरात वादळी वाºयासह पाऊस झाला़ तर, पिंपळनेर येथे वादळ नव्हते़ परंतु १० मिनीटे पाऊस झाल्याने गारवा निर्माण झाला़ साक्री शहरातील दत्त कॉलनी, येथे पावसामुळे निंबाचे झाड उन्मळून पडले़ परिसरात विजेच्या तारा तुटून पडल्याने विज पुरवठा खंडीत झाला़ कॉलनीतील जिर्ण झालेल्या विजेच्या तारा बदलण्याची नागरीकांची जुनी मागणी आहे़
पिंपळनेर, निजामपूर व जैताणे परिसरात १० ते १५ मिनीटे पाऊस झाला़ तर बळसाणे परिसरात वादळी पाऊस झाला़ वादळामुळे तारा तुटून पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला़