रस्त्यावर कोणी विनाकारण वाद घालत असेल, तर सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:41 IST2021-09-23T04:41:03+5:302021-09-23T04:41:03+5:30

जिल्ह्यात काही भागात आपल्या टोळ्या सक्रिय बनल्या आहेत. यापूर्वी शिरपूर टोल वाचविण्यासाठी दुसऱ्या पर्यायी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी लुबाडणूक झाल्याच्या ...

If someone is arguing on the street for no reason, beware! | रस्त्यावर कोणी विनाकारण वाद घालत असेल, तर सावधान !

रस्त्यावर कोणी विनाकारण वाद घालत असेल, तर सावधान !

जिल्ह्यात काही भागात आपल्या टोळ्या सक्रिय बनल्या आहेत. यापूर्वी शिरपूर टोल वाचविण्यासाठी दुसऱ्या पर्यायी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी लुबाडणूक झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच काही ठिकाणी वाहनचालकाची चूक नसताना, त्याची चूक असल्याचे भासवून रस्त्यावर वाद घालणे, लाेेकांना जमा करणे व पैसे उकळले जात आहेत. सर्वसामान्य माणूस वाद नकाे म्हणून यातून सुटका करण्यासाठी पैसे देऊन माेकळा हाेत आहे. काहीजण तर चक्क पाेलीस स्टेशनमध्ये तक्रारी करीत असल्याने सर्वसामान्यांची डाेकेदुखी वाढली आहे. याकडे पाेलीस प्रशासनाने लक्ष देऊन या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

अपघात झाल्याचे भासवून रस्त्यावर केली जाते लूट

वाहन चालविताना अचानक रस्त्यात येऊन वाद घातला जातो. त्यामुळे रस्त्यावर गर्दी जमा होऊन वाहतूक अडविली जाते. त्यातील काहीजण वाद मिटविण्यासाठी नुकसानीचे पैसे देण्यास सांगतात, तर काही समजूत घालतात. त्यामुळे वाद नकाे, पाेलिसांची झंझट नकाे, म्हणून अनेकजण पैसे देऊन माेकळे होण्याचे प्रकार वाढत आहेत.

पाेलिसांत तक्रार देण्याच्या धमक्या

रस्त्यात वाहने उभी करून विनाकारण वाद घालणे किंवा स्वत:हून आपल्या वाहनाला धडक देणे व नंतर माझ्या वाहनाचे नुकसान झाले म्हणून नुकसान भरपाई देण्यासाठी वाद घालणे किंवा पाेलिसांत तक्रार देण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

काय काळजी घ्यावी?

रस्त्यावर काही कारण करून काेणी वाद घालत असेल, तर शक्यताेवर त्याचे एकून घ्यावे व त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करावा. तरीही काहीही न ऐकता पैशाची मागणी करीत असल्यास पाेलिसांत तक्रार करावी. अन्यथा आपली फसवणूक हाेऊ शकते.

Web Title: If someone is arguing on the street for no reason, beware!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.