पतीकडून पत्नीचा गळा दाबून खून

By Admin | Updated: July 12, 2017 01:07 IST2017-07-12T01:07:36+5:302017-07-12T01:07:36+5:30

पतीस अटक : धडगाव तालुक्यातील घटना

Husband's wife by pressing her throat | पतीकडून पत्नीचा गळा दाबून खून

पतीकडून पत्नीचा गळा दाबून खून

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धडगाव तालुक्यात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पतीने खुनाची कबुली दिल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडी देण्यात आली आहे़ 
खुंटामोडी बिलपाडा येथील रवींद्र कागडा वळवी याचे ८ जुलै रोजी पत्नी कोबीबाई हिच्यासोबत रात्री १० वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून भांडण झाले होते़ प्रसंगी संतापाच्या भरात रवींद्र याने कोबीबाई हिचा गळा दाबून खून केला़ रात्री ११ वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत, त्याने हा प्रकार केला़ या खुनाची वाच्यता होऊ नये म्हणून त्याने तिच्या आत्महत्येचा बनाव रचून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला़  रवींद्र याने पत्नी कोबीबाई हिचा मृतदेह घरापासून २०० फूट अंतरावर शेतात ओढून नेत आंब्याच्या झाडाला ओढणी बांधून त्यावर लटकवला़ पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती त्याने ग्रामस्थांना दिल्यानंतर धडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्या ठिकाणी हजर झाले़  परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीने रवींद्र वळवी याचा हा बनाव उघडकीस आणून त्यास ताब्यात घेतले होते़
याबाबत राजेंद्र डेमा पाडवी यांनी धडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रवींद्र याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे़

ओढत नेल्याने मृतदेहावर झाल्या जखमा
घरापासून लांबवर असलेल्या शेतातील आंब्याच्या झाडापर्यंत नेण्यासाठी रवींद्र याने कोबीबाई हिचा मृतदेह केस ओढून फरपटत नेला. यात तिच्या चेहºयावर जखमा झाल्या, कानातील दागिना तुटून पडला़ त्यानंतर तिच्याच ओढणीने गळ्याला फास देत मृतदेह झाडाला टांगून दिला़ पोलिसांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर मृतदेहावरच्या जखमा आणि जमिनीवरील खुणा यामुळे हा प्रकार उघड झाला़ पती रवींद्र यास पोलिसांनी ताब्यात घेत त्याला धडगाव न्यायालयात हजर असता, सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली़ पोलीस निरीक्षक संजय भामरे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक नारायण चव्हाण हे तपास करीत आहेत़

Web Title: Husband's wife by pressing her throat