एमआयएमच्या शेकडो कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:41 IST2021-09-23T04:41:01+5:302021-09-23T04:41:01+5:30
धुळे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची अज्ञात व्यक्तींने तोडफोड ...

एमआयएमच्या शेकडो कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला निषेध मोर्चा
धुळे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची अज्ञात व्यक्तींने तोडफोड केली. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी आमदार डॉ. फारूख शाह यांच्यासह शेकडाे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी आंदोलकांनी घराबाहेर नेम प्लेट, दिवा आणि खिडकीच्या काचा फोडत नुकसान केले आहे. यावेळी खासदार असदुद्दीन ओवेसी निवासस्थानी नव्हते. खासदार ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात यावी, या मागणीसाठी आमदार डॉ. शाह यांनी केली आहे. यावेळी नगसेवक युसुफ मुल्ला, सईद बेग, नासीर पठाण, गनी डॉलर, शहराध्यक्ष नुरा ठेकेदार, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. दीपश्री नाईक, महिला शहराध्यक्ष फातेमा अन्सारी, युवा जिल्हाध्यक्ष वसीम अक्रम, युवा अध्यक्ष सेहबाज फारूक शाह, साबीर पत्रकार, अमीर पठाण, साजीद साई, सलीम अन्वर शाह, निजाम सय्यद, हलीम अन्सारी, आसिफ पोपट शाह, परवेज शाह, रफिक शाह पठाण, शोएब मुल्ला, निसार अन्सारी, माजीद पठाण, इरफान, नजर खान, कैसर पेंटर, चिराग खतीब, शाहीद सर, सऊद सरदार, जुनेद पठाण, समीर मिर्झा, सलमान खान, युसुफ पिंजारी समीर शेख, शाकीब हाजी आदी उपस्थित होते.