किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:24 IST2021-06-19T04:24:23+5:302021-06-19T04:24:23+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळा तूर्त तरी ऑनलाइन पद्धतीने भरणार आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याबाबतच्या सूचना ...

किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ?
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळा तूर्त तरी ऑनलाइन पद्धतीने भरणार आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याबाबतच्या सूचना माध्यमिक, प्राथमिक शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. त्यानुसार शाळांनी तयारी केली आहे. समूह अध्यापनाअंतर्गत विद्यार्थ्यांचे छोटे-छोटे गट करून त्यांना शिक्षण देण्याचा पर्यायही शिक्षण विभागाने सुचविला आहे. जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये कोविड केअर सेंटर आहेत, तेथील शिक्षकांनी घरातूनच ऑनलाइन स्वरूपात विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे, अशी सूचना शिक्षण विभागाने केली. मात्र, राज्याच्या शिक्षण संचालकांनी शैक्षणिक वर्ष प्रारंभाबाबत दि. १४ जूनच्या पत्राद्वारे काही सूचना शिक्षण उपसंचालकांना केल्या आहेत. त्यामध्ये शिक्षकांच्या उपस्थितीची टक्केवारी निश्चित केली आहे. त्यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून आदेश काढण्यात यावेत, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.
जिल्ह्यातील शाळा...
जिल्हा परिषद शाळा- ११०५
विनाअनुदानित शाळा - ११३
शिक्षक- ४१२९
शिक्षकेतर कर्मचारी - १२८६
संचालकांचे पत्र काय?
शिक्षण संचालकांच्या पत्रामध्ये इयत्ता पहिली ते नववी, अकरावीच्या ५० टक्के आणि दहावी, बारावीच्या १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य राहील. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के राहील. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांची १०० टक्के उपस्थिती राहील, असे म्हटले आहे.
जिल्हा परिषदेचे पत्र काय?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षण द्यावे. मात्र, शाळेतील उपस्थितीच्या टक्केवारीचा शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रामध्ये उल्लेख नव्हता.
शिक्षकांची कसरत
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने पालक विद्यार्थांना शाळेत पाठविण्यात तयार होत नाही तर शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय जरी योग्य असला तरी शिक्षकांची मोठी कसरत होणार आहे.
-संदीप पवार, शिक्षक
जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्यास काही हरकत नाही; मात्र शिक्षण विभाग व जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्याची परिस्थितीला पाहून निर्णय घेण्याची गरज आहे.
-जयदीप मोेरे