जगायचे कसे? घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:24 IST2021-07-04T04:24:27+5:302021-07-04T04:24:27+5:30

आठ महिन्यांच्या कालावधीत सिलिंडरची किंमत २४१ रुपयांनी वाढली आहे. उज्ज्वला याेजनेंतर्गत केंद्र शासनाने ज्या कुटुंबाकडे गॅस उपलब्ध नाही, अशा ...

How to live Domestic gas cylinders go up by Rs 25 again | जगायचे कसे? घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागले!

जगायचे कसे? घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागले!

आठ महिन्यांच्या कालावधीत सिलिंडरची किंमत २४१ रुपयांनी वाढली आहे. उज्ज्वला याेजनेंतर्गत केंद्र शासनाने ज्या कुटुंबाकडे गॅस उपलब्ध नाही, अशा कुटुंबाला गॅस उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे जवळपास ९० टक्के कुटुंबांकडे गॅस सिलिंडर उपलब्ध आहे. ज्या वेळी उज्ज्वला याेजना राबविली जात हाेती त्या वेळी सिलिंडरच्या किमती जेमतेम ५०० ते ६०० रुपये एवढ्या हाेत्या. आता मात्र सिलिंडर ९०० रुपयांच्या जवळपास पाेहाेचला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षभरापासून केवळ २० ते ३० रुपये सबसिडी दिली जात आहे.

चाैकट

सबसिडी आता नावालाच

वर्षभरापासून गॅस सिलिंडरच्या दरात झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. सुरुवातील ग्राहकांना गॅसवर सबसिडी दिली जात होती. मात्र सध्या मिळणारी सबसिडी ही ३० ते ४० रुपये आहे. पूर्वी बॅक खात्यात मिळणा-या सबसिडीचा मोठा दिलासा मिळत होता. मात्र वाढत्या महागाईत ही सबसिडी केवळ नावालाच शिल्लक राहिली आहे.

कोट

सुरुवातीला नोटबंदी आता दोन वर्षापासून कोरोनामुळे लाॅकडाऊनचा निर्णय यामुळेे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे. शासनाने या काळात तरी भाव वाढीचा निर्णय घेणे चुकीचे आहे.

वंदना जाधव, गृहिणी

महिन्याला ९०० रुपये खर्च हाेत असल्याने बजेट बिघडत चालले आहे. शहरात गॅसशिवाय पर्याय नाही. त्यामुळे केंद्र शासनाने गॅसवर जास्त सबसिडी द्यावी.

- सुरेखा पाटील, गृहिणी

Web Title: How to live Domestic gas cylinders go up by Rs 25 again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.