देवपूरच्या गौतम नगरात मजूर महिलेचे घर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 22:13 IST2020-07-30T22:12:53+5:302020-07-30T22:13:12+5:30

गुन्हा दाखल : दागिन्यांसह २८ हजारांचा ऐजव लंपास

The house of a working woman was broken into in Gautam Nagar of Devpur | देवपूरच्या गौतम नगरात मजूर महिलेचे घर फोडले

dhule

धुळे : येथील गौतम नगरात अज्ञात चोरट्यांनी एका मजूर महिलेच्या घरातून २८ हजार रुपयांचा ऐजव चोरल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवपूरातील गोंदूर रोडवरील गौतम नगरात रत्नाबाई सुनंद भामरे यांच्या मालकीच्या प्लॉट क्रमांक ३८ मध्ये २९ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजेनंतर ही चोरी झाली़ घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला़ कपाट फोडून कपाटातील पाच हजार रुपये रोख, साने आणि चांदीचे दागिने असा एकूण २८ हजार ३०० रुपये किंमतीचा ऐजव चोरुन नेला़ रत्नाबाई भामरे सकाळी आठ वाजता घरी परतल्यावर हा प्रकार लक्षात आला़ त्यांनी याबाबत पोलीसांना माहिती दिली़ त्यानंतर श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले़
घरात रक्ताचे डाग होते़ घरफोडी करताना एखाद्या चोरट्याला इजा झाली असावी आणि त्याचे रक्त घरात पडले असावे असा अंदाज पोलिसांना वर्तवला आहे़
दरम्यान, याप्रकरणी रत्नाबाई भामरे यांच्या फिर्यादीवरुन देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास सहायक पोलीस उप निरीक्षक पिंपळे करीत आहेत़

Web Title: The house of a working woman was broken into in Gautam Nagar of Devpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे