प्रॉपर्टीच्या वादातून मारहाणप्रकरणी हॉटेल कर्मचाऱ्यांचे जाबजबाब घेणे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST2021-06-28T04:24:29+5:302021-06-28T04:24:29+5:30
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळ्यानजीक अवधान शिवारात हॉटेल फौजी पंजाबी व हॉटेल राजेंद्र फौजी येथे गुरुवारी सकाळी १० वाजेच्या ...

प्रॉपर्टीच्या वादातून मारहाणप्रकरणी हॉटेल कर्मचाऱ्यांचे जाबजबाब घेणे सुरू
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळ्यानजीक अवधान शिवारात हॉटेल फौजी पंजाबी व हॉटेल राजेंद्र फौजी येथे गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास जसबिरसिंग ऊर्फ बंटी हरभजनसिंग पंजाबी व परविंदरसिंग ऊर्फ हॅपीसिंग भरभजनसिंग पंजाबी यांच्यासोबत इतर चार ते पाच जण दाखल झाले. त्यांच्या हातात तलवार, गुप्ती, टॉमी, लोखंडी रॉड व बेसबॉलच्या दांडक्याचा त्यांच्याकडून सर्रास वापर करण्यात आला. शिवीगाळ करीत हॉटेलच्या गल्ल्यातील रोकड आणि कागदपत्रे लांबविण्यात आली होती. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. या ठिकाणी असलेल्या काही वाहनांचे नुकसान करण्यात आल्याने यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आल्यानंतर ज्या हॉटेलमध्ये ही घटना घडली त्यावेळी कोण- कोण कर्मचारी कामावर होते, त्यांचे जाबजबाब घेण्याचे काम मोहाडी पोलिसांकडून केले जात आहे. हल्ला करणाऱ्या भावांना अद्याप अटक केली नसलीतरी लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.