हॅाटेल व्यवासायिकाची तापीत आत्महत्या,
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 14:47 IST2023-06-08T14:46:53+5:302023-06-08T14:47:43+5:30
हॉटेल व्यवसायिकाने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

हॅाटेल व्यवासायिकाची तापीत आत्महत्या,
सुनील साळुंखे
शिरपूर (धुळे): हॉटेल व्यवसायिकाने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गुरूवारी सकाळी त्याचा मृतदेह तापी नदीपात्रात आढळून आला.चंद्रसिंग रजेसिंग राजपूत (वय ४२) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव असून, त्यांच्या आत्महत्याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
शिरपूर तालुक्यातील दहिवद हॅाटेल आईसाहेबचे संचालक चंद्रसिंग ऊर्फ (सर्विन) रजेसिंग राजपूत हे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होते. याबाबत शिरपूर तालुका पोलीस स्टेशन बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.
त्यांचा सर्व शोध सुरु असतांना सावळदे तापी पुलावर त्यांची मोटरसायकल आढळून आली होती.त्यावरून चनद्रसिंग ऊर्फ सर्विन यांनी तापी नदीत आत्महत्या केल्याचा संशय असल्याने बुधवार पासून तापी नदीपात्रात शोध सुरु होता. गुरूवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला.त्यांच्या आत्महत्याचे कारण मात्र अद्याप समजु शकलेले नाही. त्यांच्या पश्चात आई,पत्नी मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी शिरपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.