थाळनेला पीएचडीधारकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:40 IST2021-09-22T04:40:04+5:302021-09-22T04:40:04+5:30
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच आर. के. शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य भैरवी प्रेमचंद शिरसाठ, पंचायत ...

थाळनेला पीएचडीधारकांचा सत्कार
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच आर. के. शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य भैरवी प्रेमचंद शिरसाठ, पंचायत समिती सदस्य विजय बागुल, ग्रामपंचायत सदस्य जुबेर मन्यार, भटू शिरसाठ, अनिल मराठे, मुख्याध्यापक श्यामकांत ठाकरे, आनंदराव पाटील, सर्जेराव पाटील, धनराज मराठे, भिका मराठे, डोंगर कोळी, रामकृष्ण बोरसे, शांताराम कोळी, पांडू गायकवाड, महेंद्र बाविस्कर आदी उपस्थित होते. थाळनेर येथील एन. झेड. मराठे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवान तलवारे यांना ग्लोबल हुमन पिस विद्यापीठ मद्रासतर्फे सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉक्टर ऑफ सोशल सर्व्हिस पदवी बहाल करण्यात आली. व दगडू मिठाराम मराठे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ तर्फे वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्र अभ्यासक्रमात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी प्रधान करण्यात आली. त्याबद्दल दोघांचा सत्कार करण्यात आला.