प्रश्न: मनपकडून किती दिवसात बांधकाम परवानगी दिली जाते.
उत्तर: शासकीय पातळीवर बांधकाम मंजुरीसाठी नागरिकांना फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी राज्य शासनाने आपले सरकार पोर्टलव्दारे मनपा रचनाकार विभागाला जोडण्याचा निर्णय घेतला होता़ या पोर्टलव्दारे नोंदणी झालेल्या नोंदणी केल्याचा मेसेज मिळाल्यानंतर योग्य कागदपत्राची तपासणी करून ४५ दिवसांत नागरिकास घराच्या बांधकामाची मंजुरी कायद्यानुसार मनपाकडून दिली जात आहे.
प्रश्न : ऑनलाईन बांधकाम परवानगी यंदा किती उदिष्टे पूर्ण केली.
उत्तर: शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मनपाने १ ऑगस्ट २०१९ पासून ऑनलाईन बांधकाम परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. ऑगस्ट २०१८ ते फेब्रुवारी २०२० या ७ महिन्या त १५४४ नागरिकांनी घरकुलांना मंजुरीसाठी मनपा रचनाकार विभागाकडे प्रस्ताव सादर केले होता. त्यापैकी १३१८ घरकुलांच्या प्रस्तावांना ऑगस्ट महिन्यात मंजुरी मिळवुन देत अल्पावधीत ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करणारी राज्यात धुळे मनपा एकमेव आहे.
प्रश्न: कोरोना काळातनंतर बांधकाम व्यवसायावर परिणाम जाणवतो का?
उत्तर: कोरोना महामारीच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प होते. त्यामुळे नागरिकांना शास्तीची सवलत देण्यात आली होेती. त्यांनतर हळू हळू व्यवहार पूर्वपदावर आल्याने महानगरातुन बांधकाम क्षेत्रात पुन्हा नव्याने उभारी येत आहे. अनेकांनी घरकुलांच्या बांधकामासाठी मनपाच्या नगररचना विभागात अर्ज केले आहेत.
प्रश्न: वाॅटर हार्वेटिंगसाठी काय प्रयत्न केले जातात.
उत्तर: पाण्याची बचत होण्यासाठी शासनाकडून प्रत्येक घराला वाॅटर हार्वेटिंग करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी परवानगी देण्यापुर्वी वाॅटर हार्वेटिंग करण्याच्या सुचना दिल्या जातात. त्यासाठी पाहणी व जनजागृतीवर भर दिला जातो.
गेल्या वर्षीही मनपा अव्वल
गेल्या वर्षी नाशिक विभागात धुळे महापालिकेचा चौथा क्रमांक होता. सात महिन्यानंतर धुळे महापालिकेने राज्यात ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करीत प्रथम क्रमांक मिळविला होता. तर लातूर मनपाने दुसरा व अहमदनगर महापालिकेने तिसरा क्रमांक मिळविला होता.
घरकुलांचे ७५ टक्के उदिष्टे पुर्ण
२०१९ ते २०२० या कालावधीत ३ हजार ३२४ घरकुलांना ऑनलाईन परवानगी देत ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. अहमदनगर पालिकेने २ हजार २२८ घरकुलांना मंजुरीत देत ७० टक्के उद्दिष्ट पूर्ण करीत दुसरा तर नांदेडने ६० टक्के उद्दिष्ट पूर्ण करीत तिसरा क्रमाक पटकविला आहे. राज्यात सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा धुळे महापालिका अव्वल ठरली आहे.
प्रत्येक्ष केली जाते पाहणी
घरकुल बांधकाम करतांना शासनाकडून काही अटी व निकष आहे. परवानगी देतांना निकश तपासून परवानी दिली जाते. त्यानंतर महानगरातील चार झोनमध्ये चार मनपाचे अभियंत्याद्वारे जागेवर जाऊन पाहणी केली जाते अशी माहिती महेंद्र परदेशी यांनी सागितले.