कौटुंबिक वादातून पत्नीला रस्त्यात गाठून चिरला गळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 05:56 AM2024-04-14T05:56:44+5:302024-04-14T05:57:09+5:30

संशयित पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

His wife was cut in the street due to a family dispute in dhule | कौटुंबिक वादातून पत्नीला रस्त्यात गाठून चिरला गळा

कौटुंबिक वादातून पत्नीला रस्त्यात गाठून चिरला गळा

धुळे: काैटुंबिक वादातून पतीने पत्नीला रस्त्यात गाठून खून केल्याची घटना शनिवारी दुपारी धुळे शहरातील नकाणे रोडवर छत्रपती हॉस्पिटलच्या पाठीमागे घडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अनिता हिरामण बैसाणे (वय ४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. संशयित पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार धुळे शहरातील फुले कॉलनीत राहणाऱ्या अनिता हिरामण बैसाणे ( वय ४०) या धुणी-भांडीचे काम करतात. त्यांच्यात व पती हिरामण वाल्मीक बैसाणे (वय ४९) यांच्यात नेहमी कौटुंबिक वाद होत होते. शनिवारी दुपारी अनिता या कामावरून घरी जात असताना पती हिरामण बैसाणे यांनी त्यांना पांझरा नदीकिनारच्या समांतर रस्त्यावर असलेल्या छत्रपती हॉस्पिटलच्या पाठीमागे अडविले. 

मारहाण करत चाकूने अनिता यांचा गळा चिरला. यात अनिता यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर हिरामण बैसाणे याने पळ काढला. त्यानंतर तो जवळील एका मंदिरात लपून बसला होता. घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. 

Web Title: His wife was cut in the street due to a family dispute in dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.